घरमनोरंजन'टाईगर3'च्या सेटवर चक्रीवादळाचा तडाखा,सलमान खानला झाले कोट्यवधीं रुपयांचे नुकसान!

‘टाईगर3’च्या सेटवर चक्रीवादळाचा तडाखा,सलमान खानला झाले कोट्यवधीं रुपयांचे नुकसान!

Subscribe

महाराष्ट्र सरकार कडून विशेष परवानगी घेत सलमान खानने हा सेट मुंबई मध्ये तयार करून घेतला होता. मात्र तौत्के चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे संपूर्ण सेट उडून गेला आहे.

तौत्के चक्रीवादळाचा तडाखा महाराष्ट्रासह पाच राज्यांना बसला आहे. गुजरातमध्येही समुद्र किनारपट्टीवर असलेल्या भागाला तौत्के चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे.वादळामुळे वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला यामध्ये वीजेचे खांब, शहरातील झाडे,घरे देखील उध्वस्त झाली आहेत. या चक्रीवादळात अभिनेता सल्मांन खानला देखील मोठ्या नुकसानाला तोंड द्यावे लागले आहे. ‘टायगर 3’ या चित्रपटाच्या सेटचे मोठे नुकसान झाले असल्याचे समोर आले आहे. तौत्के चक्रीवादळामुळे संपूर्ण चित्रपटाचा सेट उडून गेला आहे. यामुळे चित्रपटाला निर्मितीहोण्या पूर्वीच भल्या मोठ्या नुकसनाचा सामना करावा लागत आहे. आणि हा आकडा अगदी कोट्यवधींच्या घरात असल्याचे कळतेय.
सलमान खानच्या ‘टायगर3’ या चित्रपटासाठी चाहते फार उत्सुक असल्याचे दिसतेय पण कोट्यवधींच्या नुकसानानंतर कदाचित चित्रपटाचे चित्रीकरण काही काळ थांबणायची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेली दोन वर्षे कोरोना व्हायरसच्या  महामारीमुळे चित्रपटाच्या चित्रीकरणास विलंब होत आहे. महाराष्ट्र सरकार कडून विशेष परवानगी घेत सलमान खानने हा सेट मुंबई मध्ये तयार करून घेतला होता. मात्र तौत्के चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे संपूर्ण सेट उडून गेला आहे.

- Advertisement -

वर्कफ्रंट विषयी सांगयाचे झाल्यास सलमानचा ‘राधे’ चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांच्या तसेच समीक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. सध्या सलमान कभी ईद कभी दिवली,अंतिम,टायगर3 आणि बर्‍याच आगामी प्रोजेक्टद्वारे भेटीस येणार आहे.


हे हि वाचा – मनिषासोबतचा ब्रेकअप आयुष्यातील सर्वात कठीण काळ, नाना पाटेकरांना आठवणीने अश्रू अनावर

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -