अमीर खानला बनवायचाय ‘Gajani’ चा सिक्वल

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अमीर खानचा एकेकाळी प्रत्येक चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट व्हायचा. मात्र काही वर्षांपासून त्याचे एकानंतर एक असे अनेक चित्रपट फ्लॉप होऊ लागले आहेत. नुकत्याच काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेला त्याचा ‘लाल सिंह चड्ढा’ देखील बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. तसेच या पूर्वीचा त्याचा ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ देखील फ्लॉप झाला होता. दरम्यान, अशातच आता अमीर त्याच्या ‘गजनी’ या सुपरहिट चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये काम करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

‘गजनी 2’ चे चित्रीकरण लवकरच होणार सुरू

मिळालेल्या माहितीनुसार, अमीर खान सध्या अल्लू अर्जुनचे वडील आणि साऊथ सिनेसृष्टीचे चित्रपट निर्माते अल्लू अरविंद यांच्यासोबत एका प्रोजेक्टवर काम करत आहे. चित्रपट निर्माते अल्लू अरविंद यांनीही ‘गजनी 2’ संदर्भात अमीर खानसोबत चर्चा केली आहे.

अमीर खानचा ‘गजनी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बंपर हिट ठरला. चित्रपटासोबतच उद्योगपती संजय सिंघानियाच्या अभिनेत्याच्या व्यक्तिरेखेनेही सर्वांची मने जिंकली. संजय सिंघानियाच्या या व्यक्तिरेखेला पुढे घेऊन निर्माता अल्लू अरविंद ‘गजनी 2’ ची भूमिका तयार करत आहे.

दरम्यान, अमीर खान सध्या स्नेहा रजनीसोबत एका दमदार नाटकासाठी चर्चा करत आहे. त्याला प्रशांत नीलच्या पॅन इंडिया चित्रपटाची ऑफर ज्युनियर एनटीआर सोबत देण्यात आली आहे.


हेही वाचा : लंडनमध्ये संपन्न झाले ‘कैरी’चे चित्रीकरण