अजय देवगणच्या ‘सिंघम अगेन’ चित्रपटाच्या शूटिंगला लवकरच होणार सुरुवात

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण सध्या त्याच्या ‘दृश्यम 2’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट 18 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला असून अवघ्या 14 दिवसांत या चित्रपटाने 163 कोटींचा टप्पा पार केला आहे. अशातच अजय देवगण आता आगामी ‘सिंघम अगेन’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. 2011 मध्ये रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंघम चित्रपट आला होता. त्यानंतर सिंघमचा सिक्वेल ‘सिंघम रिटर्न्स’ देखील प्रदर्शित झाला. दरम्यान, आता रोहित शेट्टी आणि अजय देवगण ‘सिंघम अगेन’ चित्रपट घेऊन येणार आहेत.

‘सिंघम अगेन’ची झाली घोषणा

नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, रोहित शेट्टीच्या ‘सिंघम 3’ ची घोषणा करण्यात आली आहे. हा चित्रपट आतंकवादावर आधारित असून यामध्ये चित्रपटाचा नायक आतंकवाद्यांना पकडण्यासाठी पाकिस्तानात जातो.

एप्रिल 2023 पासून सुरु होणार ‘सिंघम अगेन’ची शूटिंग
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोहित शेट्टी एप्रिल 2023 पासून सुरु होणार ‘सिंघम अगेन’ची शूटिंगला सुरुवात करणार आहे. कारण सध्या तो सर्कस चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

‘सिंघम अगेन’मध्ये सिम्बा आणि सूर्यवंशी
अजय देवगण व्यतिरिक्त ‘सिम्बा’ आणि ‘सूर्यवंशी’मधील दोन अधिकारी देखील ‘सिंघम अगेन’मध्ये दिसणार आहेत.

 

 


हेही वाचा :

‘दृश्यम 2’चा बॉक्स ऑफिसवर दबदबा; लवकरच करणार 200 कोटींचा टप्पा पार