2023 मध्ये सुरू होणार ‘हेरा फेरी 3’च्या चित्रीकरणाला सुरुवात

फिरोज नाडियाडवाला लवकरच तिन दिग्गज कलाकारांना एकत्र घेऊन पुन्हा हेरा फेरीचा तिसरा भाग तयार करणार आहे.

‘हेरा फेरी’ या विनोदी चित्रपटाच्या सीरीजला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर आता प्रेक्षक या चित्रपटाच्या पुढच्या पार्ट्सची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, आता या चित्रपटाबाबत नवीन अपडेट्स समोर आली आहे. अभिनेता अक्षय कुमार, सुनिल शेट्टी आणि परेश रावल यांच्या बहुचर्चित ‘हेरा फेरी 3’चा नवा पार्ट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

परेश, सुनील आणि अक्षयला एकत्र करण्याचा प्रयत्न सुरू
मिळालेल्या माहितीनुसार, फिरोज नाडियाडवाला लवकरच तिन दिग्गज कलाकारांना एकत्र घेऊन पुन्हा हेरा फेरीचा तिसरा भाग तयार करणार आहे. निर्माता आनंद पंडितसोबत बोलणी करून फिरोज नाडियाडवाला चित्रपटाचा नवा पार्ट तयार करणार आहेत.

2023 मध्ये सुरू होणार शूटिंग
मीडिया रिपोर्ट्सच्या मते, ‘हेरा फेरी 3’ चं शूटिंग पुढच्या वर्षी सुरू होणार असून 2024 पर्यंत चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मात्र मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रियदर्शन करणार नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

दरम्यान, फिरोज नाडीयावाला ‘वेलकम 3’ चित्रपट सुद्धा घेऊन येणार आहेत. ते ‘वेलकम 3’ साठी योग्य दिग्दर्शकाचा शोध घेत आहेत.


हेही वाचा :

फक्त 2 महिन्यात सुष्मिता आणि ललितचा झाला ब्रेकअप; सोशल मीडियावर चर्चांणा उधाण