संचारबंदीतही सुरु राहणार मालिकांचे चित्रीकरण, ‘हे’ आहे कारण…

'ब्रेक द चेन' अंतर्गत बुधवार १४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेपासून १ मे पर्यंत राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. १४४ कलम लागू करण्यात आले आहे.

CM Uddhav Thackeray discusses with Producers Guild officials

राज्यावरील कोरोनाचे संकट निवारण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय नुकताच जाहीर केला होता. मंगळवारी महाराष्ट्रचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात १५ दिवसांसाठी संचारबंदी ची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे चित्रपट, मालिका आणि जाहिरातींच्या चित्रीकरणावरही पुन्हा बंदी घालण्यात आली आहे. मात्र या सगळ्यात आता मालिका प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. काही मालिकांचे चित्रीकरण हे मुंबईच्या बाहेर दुसऱ्या ठिकाणी होत आहे. यामध्ये ‘इमली’ आणि ‘गुम है किसी प्यार मैं’ या मालिकांचे हैदराबादमध्ये, ‘पंड्या स्टोर शो’ चे बिकानेरमध्ये तसेच ‘ससुराल सिमर का २’ याचे चित्रीकरण आग्रा येथे होत आहे. त्यामुळे प्रेक्षकांना या मालिकांचे नवे भाग पाहायला मिळणार आहे.

‘ब्रेक द चेन’ अंतर्गत बुधवार १४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेपासून १ मे पर्यंत राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. १४४ कलम लागू करण्यात आले आहे. दरम्यान अनेक निर्बंधांचे आदेश जारी करण्यात आले होते. मात्र खबरदारी बाळगत असलेल्या अनेक मालिकांच्या सेटवरही या आदेशाचा याचा परिणाम झाला. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजचे अध्यक्ष बीएन तिवारी यांनी पीटीआयला सांगितले की, ”राज्य सरकारचा सहनिर्णय हा एक मोठा धक्का आहे आम्हाला आमचे काम करायला दिले पाहिजे होते. सरकारचे नियम लक्षात घेऊन चित्रपट आणि टीव्ही शूटपूर्ण खबरदारी घेऊन शूट केले जात होते. पण आमचे काम थांबले तर ते आमच्यासाठी खूप हानिकारक ठरेल” असे बीएन तिवारी म्हणाले होते.


हे वाचा – तमिळ सुपरस्टार विष्णू विशाल आणि बॕडमिंटनपटू ज्वाला गुट्टा लवकरच अडकणार विवाहबंधनात