Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन आगामी चित्रपट 'बडे मियाँ छोटे मियाँ'च्या शूटिंगची मुंबईत झाली सुरुवात

आगामी चित्रपट ‘बडे मियाँ छोटे मियाँ’च्या शूटिंगची मुंबईत झाली सुरुवात

Subscribe

आगामी अ‍ॅक्शन एंटरटेनर चित्रपट ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ची घोषणा झाल्यापासून याची चर्चा सर्वत्र आहे. या चित्रपटात बॉलीवूडचे दोन सर्वात मोठे अ‍ॅक्शन हिरो, अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांना एकत्र पाहायला मिळणार असून, हे कॉम्बिनेशन प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. तसेच, पृथ्वीराज सुकुमारन देखील या सिनेमाद्वारा खलनायकाच्या व्यक्तीरेखेतून आपले अभिनय कौशल्य दाखवत दर्शकांच्या भेटीला येणार आहेत. अली अब्बास जफरद्वारा दिग्दर्शित होणाऱ्या या चित्रपटात, पूर्वी कधीही न पाहिलेले अ‍ॅक्शन सेट, जगभरातील क्रू, विशेष टेक्नोलॉजी आणि उपकरणे यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. अशातच, अनेक महिन्यांच्या कठोर तयारीनंतर, ‘बीएमसीएम’च्या निर्मात्यांनी सर्व कलाकार, क्रू आणि सिनेसृष्टीतील शुभचिंतकांसह चित्रपटाच्या शूटिंगची शुभ मुहूर्तावर सुरुवात केली.

वाशू भगनानी यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत चित्रपटाच्या मुहूर्त शॉटबद्दलचा उत्साह व्यक्त केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vashu Bhagnani (@vashubhagnani)

- Advertisement -

वाशू भगनानी, दीपशिखा देशमुख, जॅकी भगनानी, हिमांशू किशन मेहरा आणि अली अब्बास जफरद्वारा प्रोड्युस्ड, वाशू भगनानी आणि पूजा एंटरटेनमेंटद्वारा प्रस्तुत आणि अली अब्बास जफरद्वारा लिखित आणि दिग्दर्शीत तसेच, एएझेड फिल्मच्या सहयोगाने पूजा एंटरटेनमेंटचा अ‍ॅक्शन एंटरटेनर ‘बड़े मियां छोटे मियां’हा चित्रपट डिसेंबर 2023 मध्ये सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

 


- Advertisement -

हेही वाचा :

RRR मुळे प्रभावित होऊन हॉलिवूड दिग्दर्शकाने राजामौलींसोबत केली चित्रपट बनवण्याची चर्चा

- Advertisment -