घरमनोरंजनकलम ३७० हटवण्याचं 'हे' कारण होत का?

कलम ३७० हटवण्याचं ‘हे’ कारण होत का?

Subscribe

जम्मू-काश्मीरबद्दल चिंता व्यक्त करताना बॉलिवूड अभिनेत्री गौहर खान हीने टि्वट केलं. हे टि्वट सध्या खूप व्हायरल होतं आहे.

भारत सरकारने जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यापासून लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. तसेच बॉलिवूडचे अनेक कलाकार सतत टि्वट करत असतात की, काश्मीरमध्ये ते आपल्या कुटुंबातील सदस्यांशी बोलू शकत नाही आणि त्याच्याशी कोणताही संपर्क साधू शकत नाहीत. अलीकडेच या विषयाशी संबंधीत गौहर खाननेही टि्वट केलं आहे. गौहर खान हीने आपल्या टि्वटरद्वारे काश्मीर जनतेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तसेच तिने कलम ३७० हटवण्याचा अर्थ विचारला आहे. सध्या जम्मू-काश्मीरमध्ये निर्बंध घातल्या गेल्यानंतर गौहर खानचे हे टि्वट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

गौहर खान हीने आपल्या टि्वटमध्ये काश्मिरी जनतेबद्दल चिंता व्यक्त करताना असं लिहिलं आहे की, ‘आपल्या देशातील सुमारे ८० लाखपेक्षा जास्त लोक परदेशात कोणत्याही प्रकारचा संपर्क करू शकतं नाही आहे. कलम ३७० हटवणे आणि काश्मीरला आपल्यामध्ये सामील करण्याचे हे कारण आहे का? जम्मू-काश्मीरमधील संपूर्ण नागरिकांना संपर्क न करता एकत्र आणण्याचा आत्मविश्वास आपण कसा आणू शकतो? ‘

- Advertisement -

या अगोदर गौहर खान हीने जम्मू-काश्मीरमधील संवाद सुविधा विस्कळीत झाल्याबद्दल टि्वट केलं होतं. तिने त्या टि्वटमध्ये भारत सरकारला पूर्वीप्रमाणेच राज्यातील संवाद सुविधा पूर्ववत करण्याची विनंती केली होती.

- Advertisement -

गौहर खान ही एक बॉलिवूड अभिनेत्री असून ती मॉडेल देखील आहे. गौहर ने यशराजच्या ‘रॉकेट सिंह: सेल्समैन ऑफ द इयर’ या चित्रपटाद्वारे पदार्पण केलं होतं. यानंतर ती ‘गेम’, ‘इशाकजादे’, ‘ताप’, ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ आणि ‘बेगम जान’ या चित्रपटातून दिसली. या व्यतिरिक्त ती हिंदी ‘बिग बॉस ७’ची विजेता ठरली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -