घरमनोरंजन'छावा' मधून उलगडणार छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा

‘छावा’ मधून उलगडणार छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा

Subscribe

विशेष म्हणजे ही पराक्रमाची गाथा थ्रीडी अॅनिमिनेटेड रुपात पाहायला मिळणार आहे.

तमाम महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती संभाजीराजे यांनीदेखील आपले वडिल छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे इतिहास रचला. आपल्या पराक्रमाच्या जोरावर साम्राज्याचा विस्तार केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्य टिकवले. हिंदवी स्वराज्य निर्माण करणे हे सहज शक्य नव्हतं मात्र त्याहून ही कठीण होत ते टिकवणे. छत्रपती संभाजी महाराजांनी ते स्वीकारत सक्षमतेने पेलंले सुद्धा. यामुळेच आज इतक्या वर्षानंतरही मराठ्यांच्या राज्याबद्दल प्रेम आणि आकर्षण कायम लोकांच्या मनात आहे. लहानमुलांमध्येही आपल्या राज्याबद्दल आत्मियता आणि आदर पाहायला मिळते. या महान योद्धाचा पराक्रम आता लवकरच पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे ही पराक्रमाची गाथा थ्रीडी अॅनिमिनेटेड रुपात पाहायला मिळणार आहे. छावा असे या थ्रीडी अॅनिमिनेटेड पटाचे नाव असून भावेश पाटील यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. ‘छावा’ चे पोस्टर नुकतेच प्रदर्शित केले गेले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhavesh Patil (@the_bhavesh_patil)

 भावेश प्रोडक्शनचे भावेश पाटील आणि शार्कफिन स्टुडिओचे ऋतूध्वज देशपांडे यांच्या प्रयत्नांतून हा थ्रीडी ॲनिमेशनपट साकारला जात आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या अजोड पराक्रमाची गाथा पुढच्या पिढीपर्यंत अॅनिमेशनच्या माध्यमातून अधिक प्रभावी व रंजकपणे पोहचविता येईल असे दिग्दर्शक भावेश पाटील यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता संभाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा थ्रीडी ॲनिमेटेड रूपात पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

- Advertisement -

हे वाचा- राखी सावंत करणार दुसऱ्यांदा लग्न

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -