“तुझी माझी जोडी जमली” नाटकातून उलगडणार दोन अभिनेत्यांची गोष्ट

आनंद म्हसवेकर लिखित दिग्दर्शित नवंकोरं नाटक रंगभूमीवर

tuzi mazi jodi jamali

तमाशात सोंगाड्या म्हणून काम करणाऱ्या दोघांचा व्यावसायिक नाटक, चित्रपटात अभिनेता होण्याचा प्रवास तुझी माझी जोडी जमली या नाटकात पाहायला मिळणार आहे. आनंद म्हसवेकर लिखित दिग्दर्शित या नाटकात प्रणव रावराणे, मुकेश जाधव, अमृता रावराणे, निखिला इनामदार अशी उत्तम स्टारकास्ट असून नुकतंच हे नवंकोरं नाटक रंगभूमीवर आलं आहे.

हेही वाचा – ऍक्शनचा तडका असलेला ‘फेमस’ चित्रपट येतोय लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस

जिव्हाळा या संस्थेने नाटकाची निर्मिती केली आहे. तर शांभवी आर्टसने हे नाटक प्रकाशित केले आहे. नाटकाचं संगीत सुखदा भावे-दाबके यांनी, नेपथ्य अनिश विनय यांनी केलं आहे. विनय म्हसवेकर निर्मिती प्रमुख, गोट्या सावंत सूत्रधार आहेत. प्रणव रावराणे आणि मुकेश जाधव यांनी अनेक नाटकं आणि चित्रपटात अभिनेता होण्याचा प्रवास, त्यांच्या काही अडचणी आणि मराठी प्रेक्षकांनी मराठी सिनेमाकडे फिरवलेली पाठ, या प्रश्नांवर, प्रेक्षकांचे मनोरंजन करीत हसवता हसवता मार्मिक भाष्य या नाटकातून केले आहे. अमृता रावराणे, निखिला इनामदार यांनी त्यांना उत्तम साथ दिली आहे.

मराठी रंगभूमीवर आनंद म्हसवेकर हे महत्त्वाचं नाव आहे. यु टर्नसारखी अनेक आशयसंपन्न नाटकांचं लेखन आणि दिग्दर्शन त्यांनी केलं आहे. म्हसवेकर यांच्या नाटकांच्या मांदियाळीत आता “तुझी माझी जोडी जमली” या नाटकाचीही भर पडत आहे. त्यामुळे नाट्यप्रेमींना कसदार नाट्यकृतीचा आस्वाद घेता येणार आहे.