बंगाली अभिनेता Abhishek Chatterjee यांचं आकस्मिक निधन; Mamata Banerjee झाल्या भावुक

अभिषेक चॅटर्जी हे बंगाल चित्रपटसृष्टी आणि टेलिव्हिजन वरील लोकप्रिय अभिनेता होते, त्यांनी अनेक चित्रपटांसह बंगाली मालिकांमध्ये त्यांच्या अभिनयाचा ठसा उमटवला होता.

बंगाली चित्रपटसृष्टी आणि टेलिव्हिजनवरील सुप्रसिद्ध अभिनेता अभिषेक चॅटर्जी यांचं वयाच्या 58 व्या वर्षी दुःखद निधन झाले. सूत्रांच्या माहितीनुसार, अभिषेक चॅटर्जी यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. अभिषेक चॅटर्जी यांच्या जाण्याने बंगाल चित्रपटसृष्टीला मोठा झटका बसला. अभिषेक चॅटर्जी हे बंगाल चित्रपटसृष्टी आणि टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेता होते, त्यांनी अनेक चित्रपटांसह बंगाली मालिकांमध्ये त्यांच्या अभिनयाचा ठसा उमटवला होता.

माहितीनुसार काल म्हणजेच 23 मार्चला अभिनेता अभिषेक चॅटर्जी शूटिंग करत असताना अचानक त्यांची प्रकृती खालावली. सेटवरील लोक त्यांना रुग्णालयात घेऊन गेले, परंतु अभिषेक चॅटर्जी रुग्णालयात जाण्याऐवजी घरी निघून गेले. घरी गेल्यानंतर अभिषेक चॅटर्जींच्या घरच्यांनी डॉक्टरांना घरी बोलावून त्यांच्यावर उपचार केला. परंतु काल मध्यरात्री अभिषेक चॅटर्जींनी शेवटचा श्वास घेतला.

अभिषेक चॅटर्जींच्या निधनानंतर इंडस्ट्रीच्या कलाकारांना मोठा धक्का बसलेला आहे. लाबोनी सरकार, गौरव रॉय चौधरी, ट्रिना साहा, कौशिक रॉय आणि इतर अन्य कलाकारांनी सुद्धा अभिषेक चॅटर्जींच्या आकस्मिक निधनाबद्दल शोक व्यक्त केला. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही अभिषेक चॅटर्जींच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी ट्विट केले की, ‘आमचा युवा अभिनेता अभिषेक चॅटर्जी यांच्या अकाली निधनाबद्दल बातमी कळताच खूप दुःख झाले. अभिषेक चॅटर्जी त्यांच्या कामगिरीत प्रतिभावान आणि अष्टपैलू होते, आम्ही त्यांना नेहमी स्मरणात ठेवू. अभिषेक चॅटर्जींचं जाणं आपल्या टीव्ही मालिका आणि फिल्म इंडस्ट्रीसाठी नुकसानदायक आहे. त्यांच्या कुटुंब आणि मित्रांप्रति माझ्या भावना व्यक्त करते”

अभिनेता अभिषेक चॅटर्जीने अनेक बंगाली चित्रपटांमध्ये काम केले होते. विशेष म्हणजे त्यांनी इंडस्ट्रीतील सर्व दिग्गज अभिनेत्रींसोबत चित्रपटांमध्ये रोमान्स केलाय. ‘पाठभोला’, ‘फियेरे दाओ’, ‘जमाईबाबू’, ‘दहन’, ‘नयनेर आलो’, ‘बारीवाली’, ‘मधुर मिलन’, ‘मेयर आंचल’, ‘आलो और वान’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये ते दिसले आहेत.

बंगाली चित्रपटांव्यतिरिक्त अभिषेक चॅटर्जींनी आपल्या अभिनयाने जगभरात नाव कमावलेलं आहे, ते एका
बंगाली मालिका ‘खोरकुटो’चा भाग होते. या मालिकेत ट्रिना साहा आणि कौशिक रॉय मुख्य भूमिकेत आहेत. अभिषेक चॅटर्जी या मालिकेत ट्रिनाच्या वडिलांच्या भूमिकेत दिसत होते, त्यांचे पात्र प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. याशिवाय त्यांनी ‘मोहर’, ‘फागुन बो’ यांसारख्या अनेक शोमध्ये देखील उत्तम काम केलेय.


हेही वाचा : April Bank Holiday 2022 : एप्रिल महिन्यात ‘या’ तारखांना बँका राहणार बंद; वेळीच पूर्ण करा ही कामं