घरमनोरंजनफोटोत दिसणारी' ही' गोड मुलगी करते चित्रपट सृष्टीवर अधिराज्य

फोटोत दिसणारी’ ही’ गोड मुलगी करते चित्रपट सृष्टीवर अधिराज्य

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून हिंदी कलाकरांसह मराठी कलाकारही आपण बालपणी कसे दिसायचो याची झलक सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहेत. आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री ऐश्वर्या नारकानेही आपला बालपणीचा फोटो शेअर केला आहे . मराठी चित्रपटांसह ,मालिका आणि नाटक या तिन्ही माध्यमातून आपल्या अभिनयाच्या जोरावर ऐश्वर्याने प्रेक्षकांच्या मनात आपलं पक्क स्थान निर्माण केलं आहे. विशेष म्हणजे या अभिनेत्रीने आतापर्यंत अनेक उत्कृष्ट कलाकृती मराठी सिने इंडस्ट्रीला दिल्या असून त्यांचा अभिनय आणि एनर्जी आत्ताच्या नवोदित अभिनेत्रींना लाजवेल इतकी आहे .

ऐश्वर्या नारकर या सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. अनेकदा त्या वेगवेगळ्या फोटोस तसेच रिल्स शेअर करत असतात. वयाची पन्नाशी उलटूनही ऐश्वर्या एकदम फिट असून आपल्या वर्कआउट आणि योगाचे व्हिडिओ चाहत्यांसाठी शेअर करतात. आता त्यांनी आणखी एक नवा फोटो शेअर करून त्याला सुंदर कॅप्शन दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aishwarya Narkar (@aishwarya.narkar)

- Advertisement -

फोटो सोबत त्यांनी लिहिले की, ”मी माझ्या आई आणि बाबांची (माझ्या पालकांची) कायम आभारी आहे..””त्यांनी मला सर्वात खेळकर…प्रेमळ..आणि उत्तम बालपण दिले…ते तेव्हाही आणि आताही नेहमीच माझ्या सोबत आहेत…मी आज जे काही आहे ते फक्त आणि फक्त माझ्या सुपर पालकांमुळेच.. (आश्चर्य म्हणजे त्यांना प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात कैद करण्याची खूप आवड होती…माझ्याकडे बालपणीचे अनेक फोटो आहेत..) फक्त धन्य…”

मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या खलनायिका भूमिका साकारत असून त्यांच्या या भूमिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय. याशिवाय त्या पती अविनाश नारकर यांच्यासोबत अनेकदा वेगवेगळ्या रील शेअर करून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात.

- Advertisement -

 


हेही वाचा : लग्नानंतर पहिल्यांदा रणदीप हुड्डा पत्नीसोबत स्पॉट; व्हिडीओ व्हायरल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -