Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन राष्ट्रीय पुरस्कार पटकावताच अल्लू अर्जुनच्या घरी टीमचे सेलिब्रेशन; व्हिडीओ व्हायरल

राष्ट्रीय पुरस्कार पटकावताच अल्लू अर्जुनच्या घरी टीमचे सेलिब्रेशन; व्हिडीओ व्हायरल

Subscribe

चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाला असून 69 व्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये अनेक कलाकारांना पुरस्कार मिळाले आहेत. अभिनेत्री आलिया भट्टला ‘गंगूबाई काठियावाड़ी’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. तर आलिया अभिनेत्री कृती सेननला देखील ‘मिमी’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. तसेच साऊथ अभिनेता अल्लू अर्जुनला ‘पुष्पा: द राइज’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. दरम्यान, अल्लू अर्जुनला हा पुरस्कार मिळताच चित्रपटाची टीम खूप खूश झाली आहे. हाच आनंद व्यक्त करतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नुकत्याच पार पडलेल्या 69 व्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये अभिनेता अल्लू अर्जुनने ‘पुष्पा: द राइज’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला. या पुरस्काराची घोषणा होताच. अल्लू अर्जुनला भेटण्यासाठी चित्रपटाचे दिग्दर्शक सुकुमार त्याच्या घरी पोहोचले होते. यावेळी अल्लू अर्जुनला त्यांनी कडकडून मिठी मारली. यावेळी अल्लू अर्जुनची पत्नी आणि वडील देखील तिथे उपस्थित होते. हा व्हिडीओ पुष्पा या ट्वीटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे जो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अल्लू अर्जुनचे चाहते देखील कमेंट्स करुन आनंद व्यक्त करताना दिसत आहेत.

अल्लू अर्जुन ठरला राष्ट्रीय पुरस्कार जिंकणार पहिला तेलुगू अभिनेता
- Advertisement -

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा राष्ट्रीय पुरस्कार जिंकणार अल्लू अर्जुन पहिला तेलुगू अभिनेता ठरला आहे. 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने संपूर्ण जगभरात धुमाकूळ घातला होता. चित्रपटातील गाणी, डायलॉग, स्टाईल आणि लूकने प्रेक्षकांना भुरळ पाडली होती. अल्लू अर्जुनने चित्रपटात पुष्पा ही भूमिका साकारली होती आजही पुष्पाचे लाखो चाहते आहेत.

 


हेही वाचा : सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार न मिळाल्याने अनुपम खेर नाराज

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -