‘आदिपुरुष’च्या टीझरची प्रेक्षकांना भुरळ; सोशल मीडियावर होतेय तुफान चर्चा

मागील अनेक दिवसांपासून प्रेक्षक या चित्रपटाची आतूरतेने वाट पाहत होते. निर्मात्यांनी या चित्रपटाचं टीझर आणि ग्रँड पोस्टर प्रभू रामचंद्रांच्या अयोध्या नगरीत आयोजित केलेल्या एका समारंभामध्ये जारी केलं.

टॉलिवूड अभिनेता प्रभास आणि कृति सेननचा आगामी बहुचर्चित चित्रपट ‘आदिपुरुष’ गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. आता नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या टीझरमध्ये प्रभासचा भगवान श्रीराम अवतारात दिसत आहे. तर अभिनेता सैफ अली खान रावणाच्या रूपात दिसत आहे. मागील अनेक दिवसांपासून प्रेक्षक या चित्रपटाची आतूरतेने वाट पाहत होते. निर्मात्यांनी या चित्रपटाचं टीझर आणि ग्रँड पोस्टर प्रभू रामचंद्रांच्या अयोध्या नगरीत आयोजित केलेल्या एका समारंभामध्ये जारी केलं. प्रभास आणि कृति सेननसोबत चित्रपटाची पूर्ण टीम अयोध्येमध्ये पोहोचली होती. त्यावेळी या चित्रपटाचे पोस्टर लॉन्च करण्यात आले.

‘आदिपुरुष’च्या या टीझरची सुरूवात बॅकग्राउंडमध्ये प्रभासचा आवाज आणि त्यांच्या रामवतार वीएफवक्ससोबत होते. त्यावेळी, ‘धंस जाए ये धरती या चटक जाए ये आकाश, न्याय के हाथों होकर रहेगा अन्याय का सर्वनाश. आ रहा हूं मैं, आ रहा हूं न्याय के दो पैरों से अन्याय के दस सिर कुचलने. आ रहा हूं अधर्म का विध्वंस करने.’ असे शब्द ऐकू येतात तर शेवटी जय श्रीराम, जय श्रीराम राजा राम असा जयघोष होतो.

उत्तम VFX ने वाढवली चित्रपटाची शोभा


या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत आणि निर्माता भूषण कुमार यांनी केले असून सैफ अली खान या चित्रपटामध्ये लंकापती रावणाची भूमिका साकारली आहे. चित्रपटातील त्याचा हा लूक पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. तर अभिनेत्री कृति सेनन सीतेच्या रूपात दिसत आहे. चित्रपटामध्ये उत्तम VFX वापरण्यात आले आहे. ज्याने चित्रपटाची भव्यता आणखी वाढवलेली दिसत आहे.

‘आदिपुरुष’ 12 जानेवारी, 2023 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून हा हिंदू व्यतिरिक्त तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड यांसारख्या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.


हेही वाचा : 

‘बिग बॉस मराठी 4’ च्या घरात ‘या’ कलाकारांची एन्ट्री, पाहा स्पर्धकांची पूर्ण लिस्ट