‘सत्यप्रेम की कथा’मधील पहिल्या गाण्याचा टीझर आऊट

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपट ‘सत्यप्रेम की कथा’ 29 जून 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘सत्यप्रेम की कथा’ हा एका प्रेमकथेवरील आधारित चित्रपट असून या चित्रपटाद्वारे कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी दुसऱ्यांदा एकमेकांसोबत पडद्यावर दिसणार आहेत. याआधी ते ‘भुलभूलैया 2’ मध्ये एकत्र दिसले होते. दरम्यान, नुकताच या चित्रपटातील पहिल्या नसीब या गाण्याचा टीझर आऊट करण्यात आला आहे.

‘सत्यप्रेम की कथा’मधील नसीब गाण्याचा टीझर

 

View this post on Instagram

 

A post shared by Namah Pictures (@namahpictures)

कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांच्या ‘सत्यप्रेम की कथा’चित्रपटातील गाणं नसीबचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. हे गाणं पायल देव यांनी संगीतबद्ध केले असून विशाल मिश्रा यांनी गायले आहे. या गाण्यातील कार्तिक आणि कियारा रोमाँटिक अंदाजात दिसतील. हे संपूर्ण गाणे 27 मे रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे. ‘भूल भुलैया 2’ नंतर, कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी या ब्लॉकबस्टर जोडीला पुन्हा पडद्यावर पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक झाले आहेत.

चित्रपटाच्या नावावरुन झाला होता वाद

कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणीच्या ‘सत्यनारायण की कथा’ या चित्रपटाचं मागील काही दिवसांपूर्वी नाव बदण्यात आलं. मागच्या वर्षी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. सोबतच चित्रपचटाच्या नावावरूनही वाद सुरू झाला होता. अनेकांनी या चित्रपटाला हिंदू धर्माविरोधात असल्याचं म्हटलं, त्यानंतर आता निर्मात्यांनी सत्यनारायण की कथा हे नाव बदलून ‘सत्यप्रेम की कथा’ हे नाव ठेवण्याचा निर्णय घेतला.


हेही वाचा :

‘द डायरी ऑफ वेस्ट बंगाल’ चित्रपटच्या दिग्दर्शकाला पंजाब पोलिसांची नोटीस; नेमकं प्रकरण काय?