घरमनोरंजनविपुल अमृतलाल शाहच्या 'द केरळ स्टोरी'चा टीझर झाला प्रदर्शित

विपुल अमृतलाल शाहच्या ‘द केरळ स्टोरी’चा टीझर झाला प्रदर्शित

Subscribe

विपुल अमृतलाल शाह आपला आगामी चित्रपट ‘द केरळ स्टोरी’ प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी सज्ज आहेत. केरळ राज्यात बेपत्ता झालेल्या ३२,००० महिलांमागील सत्य घटनेवर आधारित असून, ‘द केरळ स्टोरी’चा टीझर प्रभावी आणि सत्य कथेवर आधारित असल्याचे वचन देतो. विपुल शाहच्या देखरेखीखाली सुदिप्तो सेनद्वारा दिग्दर्शित हा चित्रपट एका दहशतवादी संघटनेने केलेल्या महिलांच्या तस्करीची हृदयद्रावक आणि धक्कादायक कथा समोर आणतो.चित्रपटाच्या साध्या पण धक्कादायक टीझरमध्ये एका महिलेची कहाणी पाहायला मिळेल जिची भूमिका अदा शर्मा साकारताना दिसेल. या मुलीचे नर्स बनण्याचे स्वप्न होते, परंतु तिचे घरातून अपहरण करण्यात आले जी आयएसआयएस दहशतवादी म्हणून अफगाणिस्तानमध्ये जेरबंद आहे.

- Advertisement -

जिथे बहुतांश लोक अशा विषयांपासून दूर जातत, तिथेच निर्माते विपुल अमृतलाल शाह यांनी ४ वर्षांच्या व्यापक आणि सखोल संशोधनासह ही भयानक कथा मोठ्या पडद्यावर आणण्याचा निर्धार केला होता. दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी राज्यासह अरब देशांतही प्रवास केला. स्थानिक लोक आणि पीडितांच्या कुटुंबियांना भेट देत, मिळालेल्या निष्कर्षांमुळे त्यांना धक्का बसला. आपल्या विधानात विपुलने शाहने शेअर केले होते की, “मी पहिल्या कथनाच्या बैठकीतच माझे डोळे पाणावले.”

नुकत्याच झालेल्या तपासणीनुसार, २००९ पासून – केरळ आणि मंगळुरूमधील हिंदू आणि ख्रिश्चन समुदायातील सुमारे 32,000 मुलींचे इस्लाममध्ये धर्मांतर करण्यात आले असून, त्यापैकी बहुतांश सीरिया, अफगाणिस्तान आणि इतर आयएसआयएस आणि हक्कानी प्रभावशाली भागात आहेत. या महिलांची वेदनादायक आणि सत्य कथा या चित्रपटामार्फत पाहायला मिळेल. असे हे निष्कर्ष विपुल अमृतलाल शाह ‘द केरळ स्टोरी’द्वारे मांडणार असून, हा चित्रपट पुढच्या वर्षी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा :

तू ही शिवरायांची भूमिका करायला हवी… अक्षय कुमारला राज ठाकरेंनी दिला सल्ला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -