घरमनोरंजनज्या चित्रपटगृहात 'पठाण' दाखवण्यात येईल, ते जाळून टाका...; अयोध्येचे महंत संतापले

ज्या चित्रपटगृहात ‘पठाण’ दाखवण्यात येईल, ते जाळून टाका…; अयोध्येचे महंत संतापले

Subscribe

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान जवळपास 4 वर्षानंतर चित्रपटामध्ये झळकताना दिसणार आहे. शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे. 2018 मधील ‘जीरो’ चित्रपटानंतर शाहरुख बॉलिवूडमध्ये पुन्हा धमाकेदार कमबॅक करत आहे. 25 जानेवारी 2023 मध्ये शाहरुखचा बहुचर्चित ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत असून शाहरुख व्यक्तिरिक्त दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम देखील मुख्य भूमिकेत दिसतील. जॉन अब्राहम चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसेल. दरम्यान, नुकत्याच एक-दोन दिवसांपूर्वी या चित्रपटातील ‘बेशरम रंग’हे पहिलं गाणं प्रदर्शित करण्यात आलं होतं. जे सध्या प्रचंड चर्चेत आहे.

या गाण्याला सोशल मीडियावर अनेकांना उत्तम प्रतिसाद दिला, तर काहींना गाण्यातील बोल्ड सीन्समुळे चित्रपटाला ट्रोल करायला सुरुवात केली. अशातच आता अयोध्याचे महंत राजू दास यांनी देखील ‘पठाण’चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे. इतकंच नव्हे तर ते म्हणाले की, मी प्रेक्षकांना मागणी करतो की, ज्या चित्रपटगृहांमध्ये ‘पठाण’चित्रपट दाखवला जाईल, ते देखील तुम्ही पाहू नका.”

- Advertisement -

काय म्हणाले महंत राजू दास?
‘पठाण’चित्रपटाला विरोध करत महंत राजू दास म्हणाले की, बॉलिवूड आणि हॉलिवूड सतत सनातन धर्माची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न करत असतात. कशा प्रकारे हिंदू देवी-देवतांचा अपमान केला जाईल असा देखील ते प्रयत्न करत असतात. ‘पठाण’चित्रपटामध्ये दीपिका पादुकोणने भगव्या रंगाची बिकिनी घालून साधु संत आणि राष्ट्राच्या भगव्या रंगाचा अपमान केला आहे. ही गोष्ट दुःखद आहे.”

पुढे महंत म्हणाले की, “शाहरुख खान सतत सनातन धर्माची खिल्ली उडवत असतो. यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. मी प्रेक्षकांकडे मागणी करतो की, त्यांनी या चित्रपटाचा बहिष्कार करावा.”

- Advertisement -

 


हेही वाचा :

‘मोस्ट सर्च एशियन 2022’मध्ये उर्फी जावेदने टाकलं जान्हवी-साराला मागे

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -