शिवाजी पार्क येथे भुरट्या चोरांचा सुळसुळाट, अभिनेत्री सविता मालपेकर यांची सोनसाखळी चोरली

शिवाजी पार्क पोलिसानी सोनसाखळी चोराविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला असून सोनसाखळी चोरांचा कसून शोध घेण्यात येत आहे.

The thieves snatched the gold chain of actress Savita Malpekar

सोनसाखळी चोरांनी जेष्ठ मराठी अभिनेत्री सविता मालपेकर यांच्या गळ्यातील ३० ग्राम वजनाची सोनसाखळी खेचून पळ काढला,या घटनेत अभिनेत्री सविता मालपेकर यांच्या अंगावरील कुर्ता फाटला.सोमवारी रात्री दादर च्या शिवाजी पार्क येथील राजा बडे चौकात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये विशेष करून महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शिवाजी पार्क पोलिसानी सोनसाखळी चोराविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला असून सोनसाखळी चोरांचा कसून शोध घेण्यात येत आहे.अभिनेत्री सविता मालपेकर या दादर शिवाजी पार्क परिसरात राहण्यास आहे. सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास मालपेकर जेवण करून फेरफटका मारण्यासाठी शिवाजी पार्क मैदान, राजा बडे चौक येथे आलेल्या होत्या. फेरफटका मारून झाल्यानंतर मैदानाच्या गेट नंबर ५ येथील बाकड्यावर बसलेल्या असतांना एक अनोळखी व्यक्ती त्यांच्याकडे आली. त्याने मालपेकर यांना किती वाजले ? असे विचारले, मात्र मालपेकर यांनी त्या व्यक्तीला काहीच उत्तर न दिल्यामुळे ती व्यक्ती तेथून निघून गेली.

काही वेळाने पुन्हा तीच व्यक्ती मालपेकर बसलेल्या बाकाजवळ आली, आणि काही कळण्याच्या आत त्याने सविता मालपेकर यांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून मोटारसायकलवर बसून पळ काढला. दरम्यान सोनसाखळी मालपेकर यांच्या कुर्त्यात अडकल्यामुळे त्याचा कुर्ता देखील फाटला, मालपेकर यांनी चोर चोर ओरडतात फेरफटका मारणारे इतर नागरिकांनी मालपेकर यांच्या दिशेने धाव घेतली. या घटनेची माहिती मिळताच शिवाजी पार्क पोलिसानी धाव घेऊन सविता मालपेकर यांना सोबत घेऊन पोलीस ठाण्यात आले. मालपेकर यांच्या तक्रारिवरून पोलिसानी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला असून सोनसाखळी चोराच्या शोधासाठी विशेष पथके तयार करण्यात आले आहे.

सोनसाखळी चोरीच्या घटनेमुळे सविता मालपेकर यांना धक्का बसला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शिवाजी पार्क पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश कसबे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.


हे हि वाचा –  Porn apps Case : राज कुंद्रापाठोपाठ आणखी एका आरोपीला अटक, मुंबई पोलिसांची कारवाई