बॉबी देओलच्या ‘आश्रम’ वेबसीरिजचा तिसरा भाग लवकरच होणार प्रदर्शित

अभिनेता बॉबी देओलच्या बहुचर्चित ‘आश्रम’ वेबसीरिजचा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. याआधीच्या ‘आश्रम’ वेबसीरिजच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाल्यानंतर आता तिसरा भाग प्रदर्शित होणार असल्याची घोषणा बॉबी देओलने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर केली आहे. बॉबी देओलने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये तीन हा आकडा दिसत आहे, सोबतच आग सुद्धा दिसत आहे. या वेबसीरिजमधील अभिनेत्री ईशा गुप्ताने देखील हाच व्हिडीओ तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Esha Gupta (@egupta)

मात्र अजून ‘आश्रम ३’ वेबसीरिज नक्की कधी प्रदर्शित होणार हे स्पष्ट झाले नाही. पण या वेबसीरिजच्या चित्रीकरणाचे काम पूर्ण झालं असल्याचं बोललं जात आहे. प्रकाश झा दिग्दर्शित या वेबसीरिजने बॉबी देओलच्या करिअरला एक नवी दिशा मिळाली आहे. बॉबी देओलने यामध्ये साकारलेली बाबा निराला ही भूमिका प्रचंड गाजली असून राजकारण, ड्रग्स प्रकरण या सगळ्या विषयांवर आधारित ही वेबसीरिज प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत आहे.

बॉबी देओल गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटसृष्टीपासून लांब होता. मात्र ‘आश्रम’ वेबसीरिजच्या माध्यमातून त्याने पुन्हा अभिनय क्षेत्रात कमबॅक केले आहे. शिवाय आता तो लवकरच ‘एनिमल’ या हिंदी चित्रपटामध्ये देखील दिसणार आहे.

सध्या मनोरंजनाच्या दुनियेत वेबसीरिजला जास्त प्राधान्य दिले जात आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी या क्षेत्राची निवड केली आहे. तसेच वेबसीरिजमध्ये दाखवले जाणाऱ्या चांगल्या कटेंटमुळे प्रेक्षक वेबसीरिजला चांगला प्रतिसाद देऊ लागले आहेत.

 


हेही वाचा :उर्मिला आणि आदिनाथच्या नात्यामध्ये दुरावा……..’हे’ आहे कारण!