करण जोहरच्या बायोपिकमध्ये ‘हा’ अभिनेता साकारणार मुख्य भूमिका

बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक करण जोहर आगामी काळात त्याची बायोपिक तयार करणार आहे. त्यासाठी त्याची भूमिका साकारण्यासाठी त्याने अभिनेता रणवीर सिंह योग्य असल्याचं म्हटलं आहे. या व्यतिरिक्त करणने म्हणाला की, त्याला वाटतं की त्याचं बालपण पडद्यावर दाखवलं जावं कारण, त्याच्याकडे लहानपणीच्या अद्भूत आठवणी आहेत आणि त्याच्या आई-वडीलांनी देखील त्याला चांगली शिकवण दिली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या हिंदी टेलिव्हिजनवरील ‘झलक दिखलाजा’ कार्यक्रमामध्ये करण जोहरला विचारण्यात आलं की, “त्यांच्या बायोपिकमध्ये कोणता अभिनेता तुमची भूमिका उत्तम निभावू शकतो. यावेळी करणने रणवीर सिंहचे नाव घेतले. तसेच रणवीर सिंह माझी भूमिका तंतोतंत निभावू शकतो.” असं देखील म्हटलं.

पुढे करण म्हणाला की, “माझं बालपण खूप छान होतं. माझे आई-वडील माझ्यासाठी खूप चांगले होते आणि त्यांनी मला माझ्या आयुष्यातील अनेक महत्वाच्या गोष्टी दिल्या. मी दुसऱ्यांच्या तुलनेत वेगळा होतो. त्यामुळे मला त्याची किंमत मोजावी लागली. हे खूप कठीण होतं. परंतु वेळ देखील खूप महत्वाची होती. कारण जेव्हा मी मागे वळून पाहतो तेव्हा मला वाटतं की मी त्यावेळी खूप काही शिकलो आहे.”

करणने वयाच्या 19 व्या वर्षापासून केली दिग्दर्शनाला सुरुवात
चित्रपट निर्माता यश जोहर आणि हीरु जोहर हे करणचे आई-वडील आहेत. कुछ कुछ होता है या चित्रपटापासून करणने दिग्दर्शनाला सुरुवात केली. त्यानंतर करणने ‘कभी खुशी कभी गम’, ‘कभी अलविदा ना कहना’, ‘माय नेम इज खान’, ‘स्टूडंट ऑफ द ईयर’ अशा अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले.


हेही वाचा :

अब्जाधीश किम कार्दशियनचा घटस्फोट, पतीकडून दहमहा घेणार इतकी पोटगी