जून महिन्यात OTT प्लॅटफॉर्मवर पाहता येणार ‘हे’ चित्रपट आणि वेब सीरिज

जून महिना नुकताच सुरू झाला असून येत्या महिन्यात काही जबरदस्त वेब सीरिज सुद्धा रिलीज होणार आहेत. जून महिन्यात बॉबी देओलच्या ‘आश्रम 3’ पासून ‘रनवे 34’ पर्यंत बऱ्याच वेब सीरिज प्रेक्षकांना पाहता येणार आहेत.

जून महिन्यात OTT प्लॅटफॉर्मवर पाहता येणार चित्रपट आणि वेब सीरिज

  • आश्रम 3


बॉलिवूड अभिनेता बॉबी देओलची ‘आश्रम 3’ वेब सीरिज या महिन्यात पाहता येणार आहे. या तिसऱ्या भागाचे दिग्दर्शन प्रकाश झा यांनी केले आहे. याआधीचे दोन भाग खूप हिट झाले होते, त्यामुळे हा नवीन भाग पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. ‘आश्रम 3’ वेब सीरिज 3 जून रोजी एमएक्स प्लेयरवर रिलीज होणार आहे.

  • कोड एम 2


हिंदी टेलिव्हिजन अभिनेत्री जेनिफर विंगेट कोड एमच्या पहिल्या सीजनच्या यशानंतर आता प्रेक्षकांसाठी या सीरिजचा दुसरा भाग घेऊन येत आहे. आर्मी कॅंपची एक नवी गोष्ट तुम्हाला या सीरिजद्वारे पाहायला मिळणार आहे. ही वेब सीरिज 9 जून रोजी वूट वर रिलीज होणार आहे.

  • अर्ध

टेलिव्हिजन अभिनेत्री रूबीना दिलैक आणि राजपाल यादव यांच्या अर्ध चित्रपट येत्या 10 जून रोजी zee 5 वर रिलीज होणार आहे.

  • रनवे 34


अभिनेता अजय देवगन, अमिताभ बच्चन आणि रकुल प्रीत यांचा रनवे 34 चित्रपटाने चित्रपटगृहात फारशी कमाई केली नाही, मात्र या चित्रपटाच्या क्रिटिक्स ला चांगला रिस्पॉस मिळाला होता. त्यामुळे हा चित्रपट आता 24 जून रोजी अमॅझोन प्राइम व्हिडिओ वर रिलीज होणार आहे.

  • फॉरेंसिक


24 जून रोजी फॉरेंसिक वेब सीरिज zee5 या प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या वेब सीरिजमध्ये विक्रांत मॅसी आणि राधिका आपटे मुख्य भूमिकेत दिसतील. याशिवाय या वेब सीरिजमध्ये अभिनेत्री प्राची देसाई, विंदू दारा सिंह आणि रोहित रॉय सुद्धा मुख्य भूमिकेत दिसून येतील.


हेही वाचा :http://Karan V Grover अडकला विवाह बंधनात, सोशल मीडियावर फोटो शेअर करताच चाहत्यांना बसला धक्का!