Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन सलमान खानच्या 'कभी ईद कभी दिवाली' चित्रपटाचे बदलण्यात येणार टायटल; निर्मात्यांकडून 'या'...

सलमान खानच्या ‘कभी ईद कभी दिवाली’ चित्रपटाचे बदलण्यात येणार टायटल; निर्मात्यांकडून ‘या’ नावाचा खुलासा

Subscribe

गेल्या अनेक दिवसांपासून 'कभी ईद कभी दिवाली' चित्रपट वेगवेगळ्या कारणांमुळे सतत चर्चेत आहे. एकीकडे कधी चित्रपटातील काही कलाकार चित्रपटातून माघार घेत आहेत, तर दुसरीकडे चित्रपटाचे निर्माते साउथच्या कलाकारांसोबत संपर्कात आहेत

अभिनेता सलमान खान सध्या त्याच्या आगामी ‘कभी ईद कभी दिवाली’ चित्रपटाच्या पुढील शूटिंगसाठी हैदराबाद येथे रवाना झाला आहे. चित्रपटाचे पुढील शूटिंग हैदराबाद येथे होईल. जिथे सलमान खान आपल्या चित्रपटातील स्टार कास्टसोबत २५ दिवसांपर्यंत शूटिंगमध्ये व्यस्त असेल. मात्र याचं दरम्यान, ‘कभी ईद कभी दिवाली’ चित्रपटाचे टायटल बदणार असल्याची बातमी समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, चित्रपटाती टीम या चित्रपटाचे टायटल बदलण्याचा विचार करत आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून ‘कभी ईद कभी दिवाली’ चित्रपट वेगवेगळ्या कारणांमुळे सतत चर्चेत आहे. एकीकडे कधी चित्रपटातील काही कलाकार चित्रपटातून माघार घेत आहेत, तर दुसरीकडे चित्रपटाचे निर्माते साउथच्या कलाकारांसोबत संपर्कात आहेत. आतापर्यंत बॉलिवूडचे अभिनेता आयुष शर्मा आणि जहीर इकबाल यांनी या चित्रपटातून माघार घेतली आहे. तसेच या चित्रपटामध्ये साउथमधून अभिनेता जगपति बाबू, पूजा हेगडे आणि दग्गुबाती व्यंकटेश या चित्रपटात दिसणार आहेत.

- Advertisement -

‘कभी ईद कभी दिवाली’ चित्रपटाचे बदलणार टायटल
सूत्रांच्या माहितीनुसार, चित्रपटाच्या टायटलचे नवे नाव बदलण्याचा विचार चालू असून याचे नवीन नाव ‘कभी ईद कभी दिवाली’ ऐवजी ‘भाईजान’ ठेवण्याचा विचार चालू आहे.कदाचित पुढील काही दिवसात याची अधिकृत घोषणा केली जाईल.

सलमान खानने केला खुलासा
सूत्रांच्या मते, या वर्षीच्या सुरूवातीला चित्रपटाचे टायटल ‘भाईजान’ असल्याचे समोर आले होते. सलमानने त्यावेळी ‘कभी ईद कभी दिवाली’ हेच त्यांच्या चित्रपटाच्या टायटलचे नाव आहे मात्र आता पुन्हा एकदा या चित्रपटाचे नाव निर्मात्यांनी बदलण्याचा विचार केला आहे.

- Advertisement -

या चित्रपटाशिवाय सलमान खान आता ‘टाइगर 3’, ‘बजरंगी भाईजान 2’ आणि ‘किक 2’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.


हेही वाचा :http://नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होणार नयनतारा-विग्नेशच्या लग्नाचा व्हिडीओ अल्बम

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -