‘या’ दिवशी होणार ‘लाल सिंह चढ्ढा’ चित्रपटाचे ट्रेलर लॉन्च

'लाल सिंह चढ्ढा' चित्रपटाचे ट्रेलर २९ मे रोजी टी२० क्रिकेट फाइनल मॅचमध्ये पहिल्या इनिंगच्या दुसऱ्या वेळी आऊट केले जाईल

बॉलिवूडचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट ‘लाल सिंह चढ्ढा’ची प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत आहेत. या चित्रपटात अभिनेता आमिर खान आणि अभिनेत्री करीना कपूर मुख्य भूमिकेत दिसून येणार आहेत. आता या चित्रपटाच्या ट्रेलरबाबत एक माहिती समोर येत असून सूत्रांच्या मते ‘लाल सिंह चढ्ढा’चा ट्रेलर आईपीएलच्या समापन समारंभा दरम्यान लॉन्च करण्यात येणार आहे. एक व्हिडिओ शेअर करत आमिर खानने त्याच्या प्रोडक्शन हाऊसच्या इंस्टग्राम अकाउंटवर ही माहिती दिली आहे.

या व्हिडिओमध्ये आमिर खानला एक व्यक्तीने ‘लाल सिंह चढ्ढा’ चित्रपटाचे ट्रेलर कधी दाखवणार याबाबत विचारले. तेव्हा आमिर खान म्हणाला की, २९ मे रोजी आईपीएलच्या शेवटच्या मॅच दरम्यान पहिल्या इनिंगच्या दुसऱ्या टाइम आऊट वेळी चित्रपटाचे ट्रेलर लॉन्च करण्यात येईल. प्रोडक्शन हाऊसने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर लिहिलंय की, ‘लाल सिंह चढ्ढा’ चित्रपटाचे ट्रेलर २९ मे रोजी टी२० क्रिकेट फाइनल मॅचमध्ये पहिल्या इनिंगच्या दुसऱ्या वेळी आऊट केले जाईल.

दिग्दर्शक अद्वैत चंदन यांच्या ‘लाल सिंह चढ्ढा’मध्ये आमिर खान मुख्य भूमिका साकारणार असून अभिनेत्री करीना कपूर त्याच्या प्रेमिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय ‘लाल सिंह चढ्ढा’मध्ये साउथ अभिनेता नागा चैतन्य आणि मोना सिंह सुद्धा महत्त्वाची भूमिका साकारताना दिसून येणार आहेत.

‘लाल सिंह चढ्ढा’ चित्रपटाची गोष्ट
हा चित्रपट १९९४ मध्ये आलेला अमेरिकन चित्रपट ‘फॉरेस्ट गम्प’चा रिमेक असून या चित्रपटाचे शूटिंग १०० पेक्षा जास्त ठिकाणी करण्यात आलं आहे. खरंतर हा चित्रपट १४ एप्रिल रोजी रिलीज होणार होता मात्र नंतर त्याची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. आता हा चित्रपट ११ ऑगस्ट २०२२ रोजी रिलीज होणार आहे.

 

 


हेही वाचा :‘Taarak Mehta…..’ मध्ये दयाबेनची एन्ट्री तर बबिता घेणार एक्झीट