दुबईतील बुर्ज खलिफावर दाखवला जाणार ‘पठाण’चा ट्रेलर

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण’हा चित्रपट येत्या 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. मागील महिन्याभरापासून हा चित्रपट चर्चेत आहे. चित्रपटातील गाणी आणि ट्रेलर पाहून शाहरुखचे अनेक चाहते चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत. दरम्यान, आता अशातच शाहरुखच्या ‘पठाण’चित्रपटाचा ट्रेलर दुबईतील प्रसिद्ध बुर्ज खलिफावर दाखवण्यात येणार असल्याची बातमी समोर येत आहे.

बुर्ज खलिफावर दाखवला जाणार ‘पठाण’चा ट्रेलर
‘पठाण’चित्रपटातील गाणी आणि ट्रेलर सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक झाले आहेत. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, दुबईतील प्रसिद्ध बुर्ज खलिफावर‘पठाण’चा ट्रेलर दाखवण्यात येणार आहे. शाहरुख खान सध्या इंटरनॅशनल लीग T20 साठी मिडल इस्टमध्ये आहे. ‘पठाण’चा ट्रेलर ज्यावेळी बुर्ज खलिफा येथे प्रदर्शित होईल तेव्हा तो तिथे उपस्थित असणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

इंटरनॅशनल डिस्ट्रीब्युशनचे उपाध्यक्ष नेल्सन डिसोझा म्हणाले की, “पठाण हा चित्रपट सध्याच्या बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे आणि असा चित्रपट प्रेक्षकांसमोर सादर करण्याचा सर्वात मोठा मार्ग स्वीकारला पाहिजे. दुबईच्या बुर्ज खलिफा येथे शाहरुख खान आणि पठाण यांचा आनंदोत्सव साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.”

‘बेशरम रंग’गाण्याला विरोध
चित्रपटातील ‘बेशरम रंग’या गाण्याबद्दल काही लोक सतत विरोध करत आहेत. शिवाय या गाण्यामध्ये दीपिकाने भगव्या रंगाची बिकनी घालून हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप अनेकांकडून करण्यात आला आहे. या चित्रपटामुळे सामान्य व्यक्तींपासून राजकीय व्यक्तींपर्यंत अनेकजण आपली प्रतिक्रिया सतत मांडत आहेत.

 


हेही वाचा :

‘बांबू’चा भन्नाट ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला