समंथाच्या ‘यशोदा’ चित्रपटाच्या ट्रेलरची प्रेक्षकांना भुरळ

टॉलिवूडची सुपरस्टार समंथा रुथ प्रभुचा आगामी ‘यशोदा’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षक ट्रेलरचं भरभरुन कौतुक करत आहेत. या ट्रेलरमध्ये समंथा दमदार अंदाजात दिसत असून जबरदस्त अॅक्शन करताना दिसत आहे. या सस्पेंस आणि थ्रिलरने भरलेल्या चित्रपटामध्ये समंथाने एका गर्भवती महिलेची भूमिका साकारली आहे. या ट्रेलरमध्ये समंथाला डॉक्टर सांगतात की, ती 3 महिन्यांची गर्भवती आहे.

प्रेक्षकांना आवडला ‘यशोदा’चा ट्रेलर

समंथाचा आगामी ‘यशोदा’ चित्रपटाचा ट्रेलर पाहून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. सोशल मीडियावर या ट्रेलरचं प्रचंड कौतुक केले जात आहे. एका युजरने या ट्रेलरच्या व्हिडीओवर कमेंट करत लिहिलंय की, “यशोदा ब्लॉकबस्टर सिद्ध होईल”, तर दुसऱ्या युजरने कमेंट करत लिहिलंय की, ट्रेलर पाहून माझ्या अंगावर काटा आला. समंथा आणि तिच्या टीमने जबरदस्त धमाल केली आहे.

5 भाषांमध्ये प्रदर्शित झाला ‘यशोदा’चा ट्रेलर
समंथा रुथ प्रभुचा आगामी ‘यशोदा’ चित्रपट 5 भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर देखील 5 भाषांमध्येच प्रदर्शित करण्यात आला आहे. दरम्यान, 11 नोव्हेंबर रोजी ‘यशोदा’ चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटानंतर ‘फॅमिली मॅन 2’ मध्ये देखील दिसून येणार आहे.


हेही वाचा : 

‘थँक गॉड’च्या कमाईत घसरण; प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी कमावले केवळ एवढे कोटी