घरमनोरंजनबहुप्रतिक्षित ‘पोन्नियन सेल्वन 2' चा ट्रेलर 'या' दिवशी होणार प्रदर्शित

बहुप्रतिक्षित ‘पोन्नियन सेल्वन 2′ चा ट्रेलर ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

Subscribe

भारतात इतर चित्रपटांच्या तुलनेत साऊथच्या चित्रपटांचे अनेक चाहते आहेत. या चित्रपटांची कथा प्रेक्षकांना नेहमीच आकर्षित करते. चाहते नेहमीच या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत असतात. साऊथ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक मणिरत्नमचा ‘पोन्नियन सेल्वन’ हा चित्रपट 30 सप्टेंबर 2022 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आणि त्याने जबरदस्त कमाई केली. आता ‘पोन्नियन सेल्वन 2′ चित्रपटाचा दुसरा भाग 28 एप्रिल 2023 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून आता चित्रपटाच्या निर्मात्यांनी ‘पोन्नियन सेल्वन 2′ च्या ट्रेलरच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.

‘पोन्नियन सेल्वन 2′ चा ट्रेलर 29 मार्चला होणार प्रदर्शित

- Advertisement -

नुकत्याच शेअर करण्यात आलेल्या या चित्रपटाच्या पोस्टरवर अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि चियान विक्रम दिसत आहेत. ‘पोन्नियन सेल्वन’ चित्रपट लेखक कल्की कृष्णमूर्ती यांच्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित आहे. ‘पोन्नियन सेल्वन 2′ च्या ट्रेलरपूर्वी निर्मात्यांनी मुख्य अभिनेता चियान विक्रमचा लूक देखील शेअर केला आहे. दरम्यान, आता चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी अधिक उत्सुक झाले आहेत.

पोन्नियन सेल्वन 2′ मध्ये दिसणार हे कलाकार

‘पोन्नियन सेल्वन 2’ चित्रपटात चियान विक्रम, कार्ती, जयम रवी, त्रिशा कृष्णन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. दिग्दर्शक मणिरत्नम यांचा चित्रपट पहिल्या भागाप्रमाणेच कमाई करेल अशी अपेक्षा वर्तवली जात आहे. ‘पोन्नियन सेल्वन’ चित्रपटाने भारतात 250 कोटी आणि जगभरात 450 कोटींची कमाई केली होती.

- Advertisement -

 


हेही वाचा :

भाईजानच्या शत्रूंचे डोळे फुटावेत… सलमानला मिळालेल्या धमकीवर राखीची प्रतिक्रिया

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -