घरमनोरंजन"एक होतं माळीण"मधून मोठ्या पडद्यावर दिसणार माळीण गावातील दुर्दैवी सत्यकथा

“एक होतं माळीण”मधून मोठ्या पडद्यावर दिसणार माळीण गावातील दुर्दैवी सत्यकथा

Subscribe

२०१४ च्या एका भयानक रात्री मुसळधार पावसामुळे जुन्नर तालुक्यातील माळीण गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत गावातील लोकांची जीवाची आणि संपत्तीची हानी झाली. एक संपूर्ण गाव एका रात्रीतचं नाहीसं झालं. या दुर्दैवी भयानक दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर एक हृदयस्पर्शी कथा या चित्रपटातून मांडण्यात आली आहे.

“एक होतं माळीण” या आगामी चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर नुकतचं लाँच झालं असून, येत्या २९ जुलै रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील कथा सत्यघटनेवर आधारित आहे. २०१४ मध्ये जुन्नर तालुक्यातील माळीण गावात दरड कोसळल्याची  दुर्दैवी दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेवर आधारित ‘एक होतं माळीण’ या चित्रपटातून ती घटना २९ जुलै रोजी मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले आहे.

- Advertisement -

२०१४ च्या एका भयानक रात्री मुसळधार पावसामुळे जुन्नर तालुक्यातील माळीण गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत गावातील लोकांची जीवाची आणि संपत्तीची हानी झाली. एक संपूर्ण गाव एका रात्रीतचं नाहीसं झालं. या दुर्दैवी भयानक दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर एक हृदयस्पर्शी कथा या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. मराठी चित्रपटात उत्तमोत्तम कथा असलेले चित्रपट येत असतात. त्यात आता “एक होतं माळीण” या चित्रपटाचीही भर पडणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी माळीणमधील ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधून, त्यांच्याकडून माहिती घेऊन नव्याने कथा लिहिली गेली आहे. मोठ्या मेहनतीने हा चित्रपट साकारला असून आता २९ जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

- Advertisement -

ड्रीम डॉट क्रिएशनच्या संतोष जगन्नाथ म्हात्रे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे, तर रुपेश राणे, अरूण अरुण कोंजे हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची संकल्पना, कथा, पटकथा राजू राणे यांची असून दत्तात्रय गायकर आणि राजू राणे यांनी चित्रपटाचे संवाद लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. प्रशांत मोहिते, अश्विनी कासार, अभिजित श्वेतचंद्र, सिद्धी पाटणे, अनिल नगरकर, प्रशांत तपस्वी, रामचंद्र धुमाळ, दीपज्योती नाईक हे कलाकार या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसून येतील. युवराज गोंगले यांनी या चित्रपटाचे गीतलेखन आणि संगीत दिग्दर्शन केलं आहे.


हेही वाचा :‘भारत माझा देश आहे’ हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -