Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन Anupamaa : 17 वर्षीय अनुपमाची न ऐकलेली कहाणी आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर 25...

Anupamaa : 17 वर्षीय अनुपमाची न ऐकलेली कहाणी आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर 25 एप्रिलला होणार प्रदर्शित

Subscribe

नुपमाची न एकलेली कहाणी आता आपल्याला ओटीटी प्लॅटफॉर्मद्वारे (OTT platform) लवकरच पाहिला मिळणार आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा शो अनुपमा- नमस्ते अमेरिका (Anupama- Hello America) या नावाने प्रदर्शित होणार आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो म्हणजे अनुपमा (Anupamaa). हा शो स्टार प्लसवरील सुपरहिट शोपैकी एक शो आहे. हा शो लोकप्रियतेमुळे टीआरपीच्या यादीत देखील अग्रस्थानी असतो. हा शो पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अनुपमामधील सध्याची कथा तुम्ही पाहात आहात, पण अनुपमाच्या आयुष्यातील एक भाग असा आहे की, त्याबद्दल अनेकांना माहिती नाही. अनुपमाची न ऐकलेली कहाणी आता आपल्याला ओटीटी प्लॅटफॉर्मद्वारे (OTT platform) लवकरच पाहायला मिळणार आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा शो अनुपमा-नमस्ते अमेरिका (Anupama- Hello America) या नावाने प्रदर्शित होणार आहे. ही कथा 2007 ची असून, तेव्हा अनुपमा 28 वर्षांची होती.

रुपाली गांगुली (Rupali Ganguly) हिने अनुपमा मालिकेत अनुपमा ही मुख्य भूमिका साकारली आहे. अनुपमा-नमस्ते अमेरिका या मालिकेचा प्रोमो (Promo) रुपाली गांगुली हिने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. आयुष्यात आपल्याला काहीतरी करायचे आणि काहीतरी बनायची संधी (Opportunity) मिळाली आहे. मला अभिनेत्री होण्याची संधी मिळाली. जर मी घाबरले असते तर तुमच्यासमोर उभी राहिली नसते. असे ती या प्रोमोमधील व्हिडीओमध्ये म्हणते.

- Advertisement -

 

अनुपमा 17 वर्षांची होती, तेव्हा तिला एक संधी मिळाली होती. त्यामध्ये स्वप्न जगण्याची, आयुष्य बदलण्याची आणि ओळख निर्माण करण्याची तिची अशीही गोष्ट काहींना खूप आवडीची होती. त्याबद्दल आजवर कोणीही ऐकलं नाही. म्हणून हा खास कथा खास ठिकाणी सांगण्याचे ठरवले. हा शो डिस्ने प्लस हॉटस्टारवर (Disney Plus Hosters) प्रदर्शित करणार आहेत. 17 वर्षांपूर्वीची न ऐकलेली कहाणी आता 28 वर्षीय अनुपमाचे आयुष्य बदलणार आहे. हा शो डिस्ने प्लस हॉटस्टारवर 25 एप्रिलपासून प्रदर्शित होणार आहे. यामध्ये मिनी सीरिजमध्ये (Mini series) 11 भाग असणार आहेत.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -