घरमनोरंजनटाईम्स स्क्वेअरवर झळकला 'स्वातंत्र्य वीर सावरकर' चित्रपटाचा व्हिडीओ

टाईम्स स्क्वेअरवर झळकला ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाचा व्हिडीओ

Subscribe

स्वतंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारीत ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा सावरकरांची भूमिका साकारणार आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी रणदीपने सावरकरांच्या पुण्यतिथी निमित्त अंदमानच्या सेल्युलर जेलमधील काही फोटो शेअर करत भावना व्यक्त केल्या होत्या. दरम्यान, अशातच आता रणदीपने आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये टाईम्स स्क्वेअरवर ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाचा व्हिडीओ दिसत आहे.

टाईम्स स्क्वेअरवर स्वातंत्र्य वीर सावरकर’चा व्हिडीओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Randeep Hooda (@randeephooda)

‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत असून नुकताच या चित्रपटाचा व्हिडीओ टाईम्स स्क्वेअरवर झळकला. यावेळी तिथे उपस्थित असणाऱ्या भारतीयांनी जल्लोष करत या चित्रपटाला अनेक शुभेच्छा दिल्या. शिवाय सोशल मीडियावर देखील अनेकजण या चित्रपटाला शुभेच्छा देताना दिसत आहेत.

- Advertisement -

दरम्यान, 22 मार्च 2024 रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा चित्रपट प्रामुख्याने हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटात रणदीप हुड्डासह अंकिता लोखंडे व अमित सियाल हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटासाठी रणदीप हुड्डानेही प्रचंड मेहनत घेतलेली आहे. प्रेक्षक त्याला या भूमिकेत पाहण्यासाठी फारच उत्सुक आहेत.

 


हेही वाचा : रणवीर सिंह बेस्ट पती…. व्हायरल व्हिडीओमुळे चाहते करतायत कौतुक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -