Thursday, June 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन TheFamilyMan2 : रिलीज होण्याआधीच मनोज वाजपेयीने शेअर केली भावनिक पोस्ट

TheFamilyMan2 : रिलीज होण्याआधीच मनोज वाजपेयीने शेअर केली भावनिक पोस्ट

द फॅमिली मॅन’ ही श्रीकांत तिवारी नामक एका मध्यमवर्गीय माणसाची कथा आहे. हा माणूस आपल्या कुटुंबासमोर अत्यंत घाबरट असल्याचे नाटक करतो

Related Story

- Advertisement -

बॉलीवूड मध्ये सध्या चित्रपटापेक्षा जास्त बोलबाला आहे तो वेब सिरिजचा. नुकतीच अभिनेता मनोज वाजपेयी अभिनीत ‘द फॅमिली मॅन’ वेब सिरिजचा दूसरा सीझन रिलीज झाला आहे.तब्बल दीड वर्ष चाहत्यांच्या उत्सुकतेची परिसीमा. गाठल्यानंतर ही सिरिज रिलीज करण्यात आली. ‘द फॅमिली मॅन 2’ च्या रिलीज आधीच अनेक अडचणी उपस्थित झाल्या होत्या. अभिनेता मनोज वाजपेयी यांनी लोकप्रिय सिरिज मध्ये श्रीकांत तिवारी हे पात्र साकारले आहे. मनोज वाजपेयी यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत लिहलं आहे की,”शेवटी तो दिवस आला आहे. प्रत्येक फिल्ममेकरकडे सांगण्यासाठी गोष्ट असते. तसेच प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये काही कमी जास्त होते. आमच्या साठी  ‘द फॅमिली मॅन 2’ सगळ्यात जास्त आव्हानात्मक सिरिज ठरली. ही वेळ आमच्यासाठी कठीण आहे. आमच्यापैकी असं कोणीही नाही ज्याला त्रास किंवा नुकसान झालं नाही. एकीकडे आम्ही आयुष्य हरण्याचे दुख: मानत आहोत. आणि दुसरीकडे आम्ही फ्रंटलाइन वर्कर्सच्या या कठीण परिस्थितीत अथक परिश्रम घेणार्‍या प्रशंसनीय कार्याबद्दल आणि धैर्याबद्दल कृतज्ञ आहोत. सकारात्मक आणि आशावादी राहणे आपल्या सर्वांसाठी कठीण आहे. तुमचं प्रेम आणि कौतुकामुळे आज आम्ही प्रवास करत आहोत. पॅनडॉमिक आणि लॉकडाउनमध्ये काम करत असताना, आम्ही आमच्या प्रचंड जबरदस्त स्टारकास्ट, क्रू आणि प्राइम व्हिडिओ टीमचे ऋणी आहोत,जे या काळात आमच्या सोबत आहेत. सीझन 2 मध्यरात्री रिलीज होणार आहे आणि एक गोष्ट सरळ आहे की- द फॅमिली मॅन आता तुम्हा  दर्शक आणि फॅनची आहे. आम्हाला जे काही प्रेम मिळाले आहे त्यासाठी तूमचे आभार.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Manoj Bajpayee (@bajpayee.manoj)

- Advertisement -

‘द फॅमिली मॅन’ ही श्रीकांत तिवारी नामक एका मध्यमवर्गीय माणसाची कथा आहे. हा माणूस आपल्या कुटुंबासमोर अत्यंत घाबरट असल्याचे नाटक करतो, तर दुसरीकडे तो भारतातील सर्वोत्कृष्ट गुप्तहेरांपैकी एक आहे. नॅशनल इंटॅलिजन्स एजन्सीच्या एका विशेष पथकासाठी काम करणाऱ्या श्रीकांतच्या या दुहेरी आयुष्यात घडणाऱ्या घटनांवर आधारित ही वेब सिरिज आहे. या वेब सिरिजचा पहिला सीझन तूफान गाजला होता तसेच चित्रपट समीक्षकांच्या आणि प्रेक्षकांनी या सिरिजचे भरभरून कौतुक केले होते. गेल्या वर्षीच्या सीझन प्रमाणे यंदाचा सीजनही लोकांना तितकाच आवडेल का ? तसेच हा सीझन सुद्धा तितकाच लोकप्रिय ठरेल का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
या मालिकेत मनोज बाजपेयी बरोबरच सामंथा अक्किनेनी तसेच प्रियमणी, शारीब हाश्मी, शरद केळकर, नीरज माधव, गुल पनाग, सुंदीप किशन, दर्शन कुमार, सनी हिंदुजा, श्रेया धन्वंतरी झळकणार आहे.


हे हि वाचा – नवी मालिका ‘क्रिमिनल्स-चाहूल गुन्हेगारांची’ भेटीला

- Advertisement -