घरमनोरंजनबॉलिवूडला थिरकायला लावणारी 10 पंजाबी गाणी

बॉलिवूडला थिरकायला लावणारी 10 पंजाबी गाणी

Subscribe

यो यो हनी सिंगच्या इंटरनॅशनल व्हिलेजर आल्बममधील ’अंग्रेजी बीट’ हे गाणे ’कॉकटेल’ सिनेमाच्या माध्यमातून हिंदी सिनेमाच्या पडद्यावर झळकलं आणि चार्टबस्टर ठरलं. तेव्हापासूनच पंजाबी गाणी सिनेमांच्या माध्यमातून पुन्हा एकदा वापरण्याचा ट्रेण्ड सुरू झाला तो झालाच. अंग्रेजी बीटनंतर हम्प्टी शर्मा की दुल्हनियामध्ये वापरलेली ’सॅटरडे सॅटरडे’ आणि ’मै तेनू समझाँवां की’ ही गाणीसुद्धा प्रचंड गाजली. ही दोन्ही गाणी सिनेमासाठी नव्याने तयार करण्यात आली होती आणि वर्षभर ती लोकप्रिय गाण्यांच्या यादीत अव्वल स्थानावर होती. त्यानंतर मग इंडी म्झुझिक बॉलिवूड गाण्यांच्या रूपात नव्याने सादर करणं नेहमीचेच झाले. अशीच काही आधीपासूनच गाजलेल्या आणि हिंदी चित्रपटाच्या माध्यमातून अवघ्या भारताला आपल्या तालावर नाचायला लावणार्‍या काही पंजाबी गाण्यांची ही झलक:

अंग्रेजी बीट – कॉकटेल

गाजलेली पंजाबी गाणी बॉलिवूडसाठी ’रिव्हॅम्प’ करण्याचा ट्रेण्ड पहिल्यांदा आणणारे हेच ते गाणे. कॉकटेलमधील व्हेरॉनिका म्हणजे अर्थातच दीपिका पडुकोणने या गाण्याच्या ठेक्यावर केलेला नाच प्रत्येकाच्याच आठवणींत असेल.

- Advertisement -
सॅटरडे सॅटरडे – हम्प्टी शर्मा की दुल्हनिया

इंदीप बक्षीचा आनोखा बेदुंध अंदाज मिरवणारे हे आधीच गाजलेले पंजाबी गाणे आलिया भट आणि वरुण धवन या जोडीच्या जादूसह हिंदी सिनेमाच्या पडद्यावर नव्याने झळकले. हे गाणे चार्टबस्टर ठरलेच पण अजूनही ते पार्ट्यांमध्ये आवर्जून वाजवले जाते.

हाय हील्स – की अँड का

जॅझ धामी आणि हनी सिंग यांनी मिळून बनवलेले हे ठेकेबाज गाणे पुढे अर्जून कपूर आणि करीना कपूर यांची भूमिका असलेल्या की अँड का मध्ये वापरले गेले.

- Advertisement -
हाय रेटेड गब्रु – नवाबझादे

हाय रेटेड गब्रु हे गुरू रंधवाने गायलेल्या काही चटपटीत गाण्यांच्या यादीतले एक मजेदार गाणे आहे. पण बॉलिवूडचे सर्वोत्तम डान्सर्स वरुण धवन आणि श्रद्धा कपूर यांची भूमिका असलेल्या ’नवाबझादे’ मधून जेव्हा ते नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला आले तेव्हा ते अधिकच गाजले. नवाबझादे या रोमँटिक कॉमेडीची मौज तुम्हाला 12 नोव्हेंबर 2018 रोजी रात्री 8 वाजता सोनी मॅक्सवर अनुभवता येईल.

कर गयी चुल – कपूर अँड सन्स

2012 साली याच गाण्यामुळे बादशाह या गायकाला स्वतंत्र प्रतिभेचा कलाकार म्हणून प्रसिद्धी मिळाली होती. त्यानंतर 2016 साली आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या भूमिका असलेल्या कपूर अँड सन्स या सिनेमामध्ये ते वेगळ्या ढंगात पेश करण्यात आले आणि त्यावर्षी ते नृत्यासाठी सर्वाधिक पसंतीच्या गाण्यांपैकी एक बनले.

काला चष्मा – बार बार देखो

हे थिरकते, उसळते, पार्टीसाठी अगदी चपखल असलेले गाणे बादशाहने गायला आहे. हे गाणे खरेतर एका पंजाबी गायकाने 1990 साली लिहिले होते. नव्या रूपातले कतरिना कैफ आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांची अदाकारी असलेले हे गाणे आवर्जून ऐकावे असेच आहे

मै तेरा बॉयफ्रेंड – राबता

हे गाण मूळचं पंजाबी संगीत क्षेत्रातील एक लोकप्रिय नाव जे स्टार याने गायलेले आहे. पुढे ते सुशांत सिंग राजपूत आणि कृती सेनॉन यांची भूमिका असलेल्या राबतामध्ये वापरण्यात आले. सिनेमातले हे गाणे अरिजित सिंग याने गायले आहे.

ओ हो होहो – हिंदी मीडियम

सर्वत्र डीजेमंडळींकडून वाजविल्या जाणार्‍या गाण्यांपैकी सर्वाधिक लोकप्रिय गाणी ही सुखबीर आणि इला सिंग यांनी गायलेली असतात. त्यापैकी हे गाणे हिंदी मीडियम या चित्रपटासाठी निवडले गेले व त्याच्या रफान खान आणि सबा कमर यांनी धमाल नृत्य केले.

सूट सूट करदा – हिंदी मीडियम

गुरु रंधवाचे हे मस्त गाणेसुद्धा इरफान खान आणि सबा कमर यांची भूमिका असलेल्या हिंदी मीडियम’ साठी वापरले गेले.

रॉक द पार्टी – रॉकी हॅण्डसम

बॉम्बे रॉकर्सनी तयार केलेल्या या गाण्याने 2003 साली नाचाचा माहोल तयार केला. भन्नाट ठेक्याचे हे गाणे 2016 साली नोरा फतेही आणि जॉन अब्राहम यांची भूमिका असलेल्या रॉकी हॅण्डसमसाठी वापरले गेले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -