‘चला हवा येऊ द्या’च्या कार्यक्रमात येणार हास्याचे वादळ

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ मागील 8 वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. लोकप्रिय विनोदी कलाकार भाऊ कदम, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, डॉ. निलेश साबळे हे गेले 8 वर्ष सातत्याने प्रेक्षकांना खळखळून हसवत असतात. दरम्यान, सध्या ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर बाप्पाचे धुमड्याक्यात आगमन झालेले आहे.

गणेश उत्सवाच्या निमित्ताने पुढच्या भागात झी मराठीच्या “नवा गाडी नवं राज्य”, “तू चाल पुढं” आणि “अप्पी आमची कलेक्टर” ह्या मालिकां मधील सगळे कलाकार ह्या मंचावर आवर्जून आलेले आहेत.

‘चला हवा येऊ द्या’ ची भन्नाट टीम प्रेक्षकांना व कलाकारांना पोट धरुन हसायला लावणार आहे. नेहमी प्रमाणेच ह्या मंचावर आपल्या सगळ्यांचे आवडते निलेश साबळे, भाऊ कदम, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे ह्यांनी मालिकां मधील पात्र रंगवून हास्याचे कारंजे उडवताना दिसतील.


हेही वाचा : 2023 मध्ये सुरू होणार ‘हेरा फेरी 3’च्या चित्रीकरणाला सुरुवात