फार पूर्वीपासून सावळ्या रंगाला हीन दर्जा दिला जायचा. तसेच एकेकाळी ‘डस्की कलर’ असलेल्या लोकांना सुंदर मानले जात नव्हते. आता बोलायचे झाले तर बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या भलेही ‘डस्की कलर’च्या असतील, पण त्यांनी इंडस्ट्रीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. जाणून घेऊयात या अभिनेत्रींची नावे.
- दीपिका पदुकोण-
दीपिका पदुकोण ‘डस्की कलर’ची असली तरी तिला बॉलिवूडची टॉप अभिनेत्री म्हटले जाते. अभिनेत्रीने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. दीपिका फार गोरी skintonची नाही आहे. तसेच दीपिकाच्या सुरुवातीच्या चित्रपटांमध्ये तिचा स्किन टोन पाहायला मिळतो.
- प्रियांका चोप्रा-
बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा तिच्या स्किन कलरमूळे चर्चेत असते. तसेच कोणत्याही ड्रेसेस मध्ये ती स्वतःला साध्य करत असते. एवढेच नाही तर प्रियांकाने 2000 साली मिस वर्ल्डचा किताबही जिंकला होता.
- Advertisement -
- काजोल-
काजोलने वर्षानुवर्षे इंडस्ट्रीवर राज्य केले आहे आणि आजही ती टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात तिने ज्या चित्रपटांमध्ये काम केले त्या सर्व चित्रपटांमध्ये अभिनेत्रीचा ‘डस्की कलर’ स्पष्टपणे दिसत होता. अशातच काजोलने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. इतकंच नाही तर ती अजूनही अनेक चित्रपटांमध्ये पाहायला मिळते.
- लारा दत्ता-
लारा दत्तानेही अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्रीच्या स्किन टोनबद्दल बोलायचे तर ती गोरी नसून ‘डस्की कलर’ची आहे. तिच्या या टोनमुळे ती बऱ्यापैकी चर्चेत असते.
- Advertisement -
- बिपासा बसू-
बिपाशा बसूला कोणत्याही परिचयाची गरज नाही. तसेच बिपासा बसुने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. चित्रपटांमध्येही तिचा स्किन टोन पाहून तुम्ही अंदाज लावू शकता की ती ‘डस्की कलर’ची आहे. अनेक हिट चित्रपटामध्ये बिपासा बसूने काम केले आहे.