HomeमनोरंजनNew Year Resolution 2025 : नववर्षासाठी या कलाकारांनी केलेत हे संकल्प

New Year Resolution 2025 : नववर्षासाठी या कलाकारांनी केलेत हे संकल्प

Subscribe

नवीन वर्षात प्रत्येकजण काही ना काही संकल्प करत असतात मग तो एक सर्व साधारण व्यक्ती असो किंवा सेलेब्रिटी असो. तुमच्या आवडत्या कलाकारांनीही काही संकल्प केले आहेत, चला जाणून घेऊया काय आहेत ते संकल्प आणि त्यासाठी त्यांची काय तयारी आहे.

‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील लीला म्हणजेच वल्लरी विराज म्हणाली – “माझ्या 2025 च्या टू डू लिस्ट मध्ये सर्वात पहिले आहे कत्थक विषारद परीक्षा जी मला द्यायची आहे. 2024 मध्ये मला परिक्षा द्यायची होती पण ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका मिळाली आणि त्याच्या शूट मध्ये मला वेळ काढता आला नाही. माझी विशारद पूर्ण करायची तयारी सुरु आहे. त्यासोबत मला वाचनाची सवय लावून घ्यायची आहे, तब्बेतीची काळजी घ्यायची आहे. या 3 गोष्टी माझ्या 2025 च्या टू डू लिस्ट मध्ये आहेत.”

- Advertisement -

‘सावळ्याची जणू सावली’ मध्ये सावली साकारत असलेली प्राप्ती रेडकर म्हणाली – “2025 मध्ये ज्या टॉप ३ गोष्टी करायच्या आहेत त्या मधली पहिली मला फिट राहायचे आहे. मला प्रॉपर डाएट करायचे आहे कारण त्यात मी झिरो आहे. दुसरी म्हणजे, आळशीपणा न करता मला माझं स्पोर्ट्स चालू ठेवायचे आहे आणि तिसरी ही की आई- बाबांना अभिमान वाटेल असे काम करत राहायचे आहे.”

‘लाखात एक आमचा दादा’ मधील तुळजा म्हणजेच दिशा परदेशी म्हणते – ” माझं माझ्या कामावर खूप प्रेम आहे त्यामुळे मी नवीन वर्षात कामाशी जोडलेल्या सर्व गोष्टी करणार आहे. जेवढं जास्त आणि उत्कृष्ट काम करता येईल तेवढं करणार आहे. स्वतःवर मेहनत घेणार आहे. मला माझं एक स्थान निर्माण करायचे आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, मी एक ट्रॅव्हलर आहे तर अगदी 4 दिवसांची सुट्टी जरी मिळाली तरीही एखादं देश मी एक्सप्लोर करीन 2025 मध्ये . ”

- Advertisement -

‘लक्ष्मी निवास’ मधली जान्हवी म्हणजेच दिव्या पुगावकर म्हणाली – ” पाहिलं तर मला ड्रायविंग शिकायचे आहे. मी कत्थक क्लासेस सुरु केले होते तर ते ही अर्धवट राहिले आहे, ते पूर्ण करणार आहे. मला डांस मध्ये एक प्रकार तरी शिकायचा आहे मग तो बॉलीवूड असो किंवा सेमी क्लासिकल. तिसरी गोष्ट अशी की मला वाचनाची आवड नाहीये, त्यामुळे सुरु वाचनाची सवय लावून घेण्याचा प्रयत्न करीन.”

‘लक्ष्मी निवास’ मधली भावना, अक्षया देवधर ने सांगितले, “2025 मध्ये मला माझा व्यवसाय वाढवायचा आहे, दुसरी गोष्ट आता कामात ब्रेक नाही आणि ‘लक्ष्मी निवास’ मध्ये छान काम करायचे आहे. तिसरी गोष्ट, मला माझं वजन कमी करायचे आहे, ज्यासाठी मी डाएट आणि वर्कआऊट दोनीही सुरु केले आहे.”

‘लक्ष्मी निवास’ मधली लक्ष्मी साकारत असलेली हर्षदा खानविलकर म्हणाल्या – “नवीन वर्षाची सुरुवात अगदीच उत्तम झाली आहे मी ‘लक्ष्मी निवास’ मध्ये लक्ष्मी म्हणून एक वेगळी भूमिका साकारत आहेत तर माझा प्रयत्न आहे की मी मला अधिक छान काम करता आलं पाहिजे आणि ते लोकांना आवडेल याची अपेक्षा आहे. शूटिंग मधून वेळ मिळाला कि ट्रॅव्हल ही करीन. तसं माझं स्वप्न आहे जगभर फिरायचे. मी कॉलेज काळातल्या कादंबरी मध्ये वाचलेल्या काही जागा आहेत जिथे मला जायचे आहे. पण सध्या ‘लक्ष्मी निवास’ माझं प्राधान्य आहे.”

हेही वाचा : Manjiri Oak : फोन बघत रिक्षा चालवणाऱ्या चालकावर भडकली प्रसाद ओकची पत्नी


Edited By : Prachi Manjrekar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -