बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्री आहेत सर्वाधिक श्रीमंत, त्याच्या तुलनेत पाकिस्तानी अभिनेत्री आहेत मागे

भारताच्या बाजूच्या देशातील पाकिस्तानी कलाकार सुद्धा चित्रपटसृष्टीशी जोडलेले आहेत. पाकिस्तानातील अनेक कलाकारांनी भारतात आपलं नाव कमावलेलं आहे. मात्र, यांची कमाई बॉलिवूडच्या तुलनेत खूप कमी आहे.

बॉलिवूड चित्रपटसृष्टीला देशातील सर्वात मोठ्या चित्रपटसृष्टीपैकी एक आहे. बॉलिवूडमध्ये काम करणारे कलाकार सुंदर आयुष्य जगतात. त्याची झलक आपल्याला त्यांच्या लाइफस्टाईलमधून पाहायला मिळते. भारतातील ही सर्वात मोठी चित्रपटसृष्टी अनेकांना आपल्याकडे आकर्षित करून घेते. तर दुसरीकडेच भारताच्या बाजूच्या देशातील पाकिस्तानी कलाकार सुद्धा चित्रपटसृष्टीशी जोडलेले आहेत. पाकिस्तानातील अनेक कलाकारांनी भारतात आपलं नाव कमावलेलं आहे. मात्र, यांची कमाई बॉलिवूडच्या तुलनेत खूप कमी आहे.

बॉलिवूड अभिनेत्रींच्या तुलनेत या पाकिस्तानी कलाकारांची कमाई

ऐश्वर्या राय- सजल अली


बॉलिवूडमधील सौंदर्यवती ऐश्वर्या राय हिच्याकडे जवळपास १०० मिलियन डॉलर संपत्ती आहे. म्हणजेच ऐश्वर्या ७४१ कोटींची मालकिन आहे. तर पाकिस्तानातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्रीकडे ३० मिलियन डॉलर आहेत.

प्रियांका चोप्रा- माया अली


बॉलिवूडनंतर हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा कमाईच्या बाबतीत बॉलिवूडमधील दुसऱ्या क्रमांकावरची अभिनेत्री आहे. प्रियांकाकडे जवळपास ७० मिलियन डॉलर म्हणजेच ५०० कोटींची संपत्ती आहे. तर पाकिस्तानी अभिनेत्री माया अली ही कमाईच्या बाबतीत पाकिस्तानी इंटस्ट्रीमधील दुसऱ्या क्रमांकावरची अभिनेत्री आहे. हिच्याकडे जवळपास १५ मिलियन डॉलर संपत्ती आहे.

करीना कपूर- आयशा खान


बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर कमाईच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकाची अभिनेत्री आहे. करीना कपूरकडे ६० मिलियन डॉलर म्हणजेच ४४० कोटींची संपत्ती आहे. तर पाकिस्तातील तिसऱ्या क्रमांकावरील अभिनेत्रीकडे ९ मिलियन डॉलर संपत्ती आहे.

अनुष्का शर्मा- मायरा खान


बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्रींपैकी चौथ्या क्रमांकाची अभिनेत्री आहे. अनुष्काकडे ३४० कोटींची संपत्ती आहे. तर पाकिस्तानातील चौथ्या क्रमांकाच्या मायरा खानकडे ६ मिलियन डॉलरची संपत्ती आहे.

दीपिका पादुकोण-युमना जैदी


बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणला जगभरातील प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक मानले जाते. दीपिका बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्रींपैकी पाचव्या क्रमांकाची अभिनेत्री आहे. दीपिका पादुकोणकडे जवळपास ४० मिलियन डॉलर म्हणजेच २९५ कोटींची संपत्ती आहे. तर पाकिस्तानी अभिनेत्री युमना जैदीकजडे जवळपास ५ मिलियन डॉलरची संपत्ती आहे.


हेही वाचा :‘गोष्ट एका पैठणीची’ आणि ‘जून’ चित्रपटाचं कौतुक; कलाकारांच्या आनंदित प्रतिक्रिया