घरमनोरंजनप्रेमासाठी 'या' कलाकारांनी ओलांडल्या धर्माच्या भिंती

प्रेमासाठी ‘या’ कलाकारांनी ओलांडल्या धर्माच्या भिंती

Subscribe

आंतरधर्मीय विवाह आजही अनेकांना न पटणारी गोष्ट आहे. एखाद्या मुला-मुलीने असं काही जात, धर्म, पंथ याचा विचार न करता लग्न केलं तर अनेक वेळा घरच्यांनी आयुष्यभरासाठी नाती तोडल्याच्या घटना आपण ऐकत आलो आहोत. आपल्या पोटच्या पोरा-पोरी पेक्षा इथं धर्माला, प्रतिष्ठेला महत्त्व देणारे लोक अनेक आहेत. त्यात हिंदू मुस्लिम असं असेल तर अजून प्रकरण वाढत जाते. पण बॉलीवूड मध्ये असे अनेक कपल आहेत ज्यांनी प्रेमासाठी धर्माच्या भिंती ओलांडल्या आहेत.

Shah Rukh Khan and Gauri Khan are a power couple as they come together for fresh photos | Filmfare.com

हेमा मालिनी आणि धर्मेंद्र –

हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची जोडी ७० च्या दशकात प्रेक्षकांना वेड लावणारी ठरली आहे .आजही या जोडीचा वेगळा असा चाहता वर्ग आहे. पण तुम्हाला माहित आहे का या ड्रीम गर्लशी लग्न करण्यासाठी धर्मेंद्रजी यांनी इस्लाम धर्म स्वीकारला आहे. त्यांच्या लग्नाला ४३ वर्ष झाली आहेत. आजही या जोडीकडे पाहिल्यावर हेच वाटते की या संसार करावा तर या दोघांसारखा .

शर्मिला टागोर आणि मन्सूर अली खान पतौडी –

शर्मिला टागोर – मन्सूर अली खान पतौडी यांच्या प्रेमात पडल्या होत्या. सुरुवातीला दोघांच्याही घरून या नात्याला आणि लग्नाला प्रचंड विरोध झाला . शर्मिला एक मॉडर्न कुटुंबातील होत्या. तर, मन्सूर अली खान पतौडी हे नवाबी राजघराण्यातील होते. मात्र, त्यांच्या प्रेमापुढे कुटुंबीयांनी माघार घेत, लग्नाची परवानगी दिली. लग्नानंतर त्यांचं नाव बेगम आयेशा सुलतान असं ठेवण्यात आलं. लग्नानंतर शर्मिला यांचं करियर संपेल, अशी शक्यता देखील वर्तवली गेली. मात्र, सगळे अंदाज खोटे ठरवत त्यांनी आपली कारकिर्द गाजवली.

Gauahar Khan ने दीपिका कक्कड़ और शोएब इब्राहिम के बेबी के बारे में की भविष्यवाणी, कमेंट कर बताया क्या होगा - Gauahar Khan predicts Dipika Kakar and Shoaib Ibrahim baby its a

- Advertisement -

दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम –

टीव्ही सिरिअलचे प्रसिद्ध जोडपे दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम सर्वांनाच माहीत आहे. नुकतेच दोघेही एका मुलाचे पालक झाले आहेत. दीपिकाने लग्नासाठी इस्लामचा स्वीकार केला आहे.

शाहरुख खान आणि गौरी छिब्बर- 

शाहरुख आणि गौरीची प्रेमकहाणी म्हणजे ९०च्या दशकातील चित्रपटातील एक कहाणी असं म्हणणं वावगं ठरणार नाही . गौरी हिंदू असल्याने तिच्या कुटूंबियांचा या लग्नाला विरोध होता. पण या विरोधाला न जुमानता शाहरुखने तिच्याशी लग्न केलं.

सोहेल खान आणि सीमा सचदेव-

सोहेल खानने हिंदू मुलगी सीमा सचदेवबरोबर १९९८ मध्ये प्रेम विवाह केला . कुटूंबीयांचा लग्नाला विरोध असतानाही दोघांनी लग्न केलं.

Saif Ali Khan – Kareena Kapoor Khan to move into new home to welcome second child : Bollywood News - Bollywood Hungama

सैफ अली खान आणि करीना कपूर-

सैफ अली खान आणि करीना कपूर यांनी एकमेकांना ५ वर्ष डेट केलं आहे. त्यानंतर २०१२ मध्ये ते लग्न बंधनात अडकले. लग्नापूर्वी सैफने पहिल्या पत्नीला अमृता सिंगला घटस्फोट दिला. विशेष म्हणजे त्याचा पहिला विवाहही आंतरजातीय झाला होता.

आमना शरीफ आणि अमित कपूर –

टीव्ही अभिनेत्री आमना शरीफ हीनेही तिचा प्रियकर अमित कपूरसोबत लग्न केले आहे. वेगळ्या धर्माच्या या जोडप्यांनी आपल्या प्रेमात धर्माला येऊ दिले नाही आहे .

 


हेही वाचा ;  चेन्नई मधल्या पूरग्रस्तांना सोनू ची अनोखी मदत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -