घरमनोरंजन2022 मध्ये 'या' सेलिब्रिटींनी घेतला जगाचा निरोप

2022 मध्ये ‘या’ सेलिब्रिटींनी घेतला जगाचा निरोप

Subscribe

2022 मध्ये भारतातील अनेक दिग्गज कलाकारांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनामुळे कला क्षेत्रात शोककळा पसरली. यात गाणकोकिळा लता मंगेशकर यांच्यापासून अभिनेते विक्रम गोखले, कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांच्या नावाचा समावेश आहे.

2022 मध्ये निधन झालेले दिग्गज कलाकार

- Advertisement -

पंडित बिरजू महाराज

कथक सम्राट पंडित बिरजू महाराज का निधन, राष्ट्रपति से लेकर पीएम तक ने दी श्रद्धांजलि: Kathak Maestro Pandit Birju Maharaj Passed Away, President Kovind And PM Paid Tribute
पंडित बिरजू महाराज हे भारतातील प्रसिद्ध कथ्थक नर्तक, संगीतकार आणि गायक होते. त्यांनी वयाच्या 84 व्या वर्षी दिल्ली येथील राहत्या घरी हृदयविकारामुळे निधन झाले होते.

- Advertisement -

रमेश देव

Hindi marathi film actor ramesh deo he died due to heart attack at the age of 93 three days before celebrated his birthday | बॉलीवुड और मराठी फिल्मों के एक्टर रमेश देवज्येष्ठ मराठी अभिनेते रमेश देव यांनी 2 फेब्रुवारी 2022 रोजी वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले होते. मराठी सिनेसृष्टीत नायक आणि खलनायक म्हणून त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावल्या होत्या.

लता मंगेशकर

Lata Mangeshkar: India honors singer at state funeral, dead at 92 | CNN
गाणकोकिळा लता मंगेशकर यांनी वयाच्या 92 व्या वर्षी 6 फेब्रुवारी 2022 रोजी अखेरचा श्वास घेतला. लता दीदींच्या गाण्याचे फक्त भारतातच नाही तर जगभरात चाहते आहेत. लता दीदींनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत 16 भाषांमध्ये 6500 पेक्षा जास्त गाणी गायली आहेत. त्यांची सर्वच गाणी सुपरहिट ठरली.

बप्पी लहरी

Bappi Lahiri Death: दिग्गज संगीतकार बप्पी लहरी का निधन, मुंबई के अस्पताल में ली अंतिम सांस - Bappi Lahiri Death- Veteran Singer Composer Bappi Lahiri Passes Away at The Age Of 69
80-90 च्या दशकातील तरुणाईला डिस्को संगीताच्या तालावर थिरकायला लावणारे हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ संगीतकार- गायक बप्पी लहरी यांचे वयाच्या 69 वर्षी 15 फेब्रुवारी 2022 रोजी मुंबईत निधन झाले. बप्पी लहरी यांनी बॉलिवूडशिवाय बंगाली, तेलगू आणि कन्नड चित्रपटांमध्येही गाणी गायली होती. त्यांची गाणी आजही खूप लोकप्रिय होती.

पंडित शिवकुमार शर्मा

Pandit Shiv Kumar Sharma Death: मशहूर संतूर वादक पंडित शिव कुमार शर्मा का निधन - Pandit Shiv Kumar Sharma died Indian music composer santoor player tmov - AajTak
प्रसिद्ध संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांनी 10 मे 2022 रोजी वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं होतं. संतुर वाद्याला संगीत विश्वात वेगळी ओळख निर्माण करुन देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.

के.के

I am happy not getting awards: KK - Hindustan Times
बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक केके याचे 31 मे 2022 रोजी वयाच्या 53 व्या वर्षी कोलकाता येथे निधन झाले होते. एका परफॉर्मन्सदरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्याला तातडीने सीएमआरआय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते. त्यांनी हिंदीत 200 हून अधिक गाणी गायली आहेत.

राजू श्रीवास्तव

Celebs Deaths 2022: लता दीदी से लेकर राजू श्रीवास्तव छोड़ गए दुनिया, साल 2022 में इन सेलेब्स के निधन ने खूब रुलाया
कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे 21 सप्टेंबर 2022 रोजी वयाच्या 59 व्या वर्षी निधन झाले. जिममध्ये वर्कआउट करताना त्यांना हृदय विकाराचा झटका आला होता त्यानंतर त्यांच्या अनेक दिवस उपचार सुरु होते. मात्र, 21 सप्टेंबर 2022 रोजी त्यांना अखेरचा श्वास घेतला.

तबस्सुम

तबस्सुम (हिन्दी फ़िल्म कलाकार) - विकिपीडिया
ज्येष्ठ अभिनेत्री तबस्सुम गोविल यांचे 18 नोव्हेंबर 2022 रोजी वयाच्या 78 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ‘फूल खिले हैं गुलशन गुलशन’ या शोसाठी त्या लोकप्रिय होत्या.

विक्रम गोखले


मराठीसह हिंदी आणि अन्य भाषिक चित्रपटसृष्टीत आपल्या अष्टपैलू अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे 26 नोव्हेंबर 2022 रोजी वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूनंतर मराठीसह हिंदी मनोरंजन सृष्टीट शोककळा पसरली होती.

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -