‘या’ अभिनेत्रींनी लग्न तर केलं पण वैवाहिक जीवनात छळ झाला; अगदी शिवीगाळ करण्यापर्यंत…

अशाच काही अभिनेत्रींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात पतीच्या मारहाणीचा आणि छळाचा सामना केला.

Victims-Of-Domestic-Violence
अशाच काही अभिनेत्रींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात पतीच्या मारहाणीचा आणि छळाचा सामना केला.

कौटुंबिक हिंसाचार हा एक गुन्हा आहे जो अनेकदा लपविण्याचा प्रयत्न केला जातो. कौटुंबिक हिंसाचार हे आपल्या समाजाचे वास्तव आहे, ज्याचा सामना गरीब-श्रीमंत प्रत्येक वर्गातील महिलांना करावा लागतो. भारतात अशा अनेक स्त्रिया आहेत ज्या सर्वांना मान्य असलेले काम करूनही सर्वांच्या पसंतीच्या बनत नाहीत.

असा व्यक्ती ज्याचं स्त्रीसोबत कौटुंबिक नातं असतं आणि ती व्यक्ती किंवा त्या व्यक्तीकडून स्त्रीचे शारीरिक, मानसिक, भावनिक, शाब्दिक, मानसिक किंवा लैंगिक शोषण करते, तर तो कौटुंबिक हिंसाचाराच्या कॅटेगरीत येतो. आपल्या आजूबाजूला राहणार्‍या महिलांनाच हा त्रास सहन करावा लागतो असे अजिबात नाही, अगदी बॉलिवूडमधील अभिनेत्री देखील या घरगुती हिंसाचाराला बळी पडल्या आहेत. अशाच काही अभिनेत्रींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात पतीच्या मारहाणीचा आणि छळाचा सामना केला.

 

दीपशिखा नागपाल
टीव्ही अभिनेत्री दीपशिखा नागपाल तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत होती. जीत उपेंद्रसोबतचे पहिले लग्न मोडल्यानंतर अभिनेत्रीने मॉडेल केशव अरोरासोबत लग्न केले. पण हे लग्नही फार काळ टिकू शकले नाही. अभिनेत्रीने पती केशवविरोधात मारहाणीची तक्रार दाखल केली होती. तक्रार केल्यानंतरही अभिनेत्रीने पतीला सावरण्याची संधी दिली. पण तरीही काही जमले नाही. मग अखेर तिने केशवला घटस्फोट दिला.

Deepshikha-Nagpal
टीव्ही अभिनेत्री दीपशिखा नागपाल तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत होती.

 

मंदाना करीमी
‘बिग बॉस’ स्पर्धक आणि अभिनेत्री मंदाना करीमीने २०१७ मध्ये तिचा बॉयफ्रेंड गौरव गुप्तासोबत लग्न केलं. लग्नाच्या काही महिन्यांनंतर मंदानाने पती गौरवविरुद्ध घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला. तिने आरोप केला आहे की गौरव तिला काम करण्यापासून रोखत असे आणि मित्रांना भेटण्यासही बंदी घातली. इतकंच नाही तर अनेकवेळा तिला घराबाहेरही काढलं आहे. गौरवचे आई-वडीलही मंदानासोबत गैरवर्तन करायचे, त्यामुळे मंदानाने पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

Mandana Karimi
‘बिग बॉस’ स्पर्धक आणि अभिनेत्री मंदाना करीमीने २०१७ मध्ये तिचा बॉयफ्रेंड गौरव गुप्तासोबत लग्न केलं.

 

रश्मी देसाई
‘बिग बॉस १३’ ची स्पर्धक आणि अभिनेत्री रश्मी देसाई तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. अभिनेत्रीने तिचा ‘उत्तरन’ को-स्टार नंदिश संधूशी लग्न केलं होतं, परंतु काही वर्षांतच त्यांच्या नात्यात दुरावा आला. २०१६ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर रश्मीने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिचे लग्न खूपच अपमानास्पद होते. नंदिश तिच्यावर संशय घेत असे आणि तिला काम करण्यापासून रोखत असे.

Rashmi Desai
‘बिग बॉस १३’ ची स्पर्धक आणि अभिनेत्री रश्मी देसाई तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते.

 

वहबिझ दोराबजी
अभिनेत्री वाहबिज दोराबजीने तिचा पती आणि अभिनेता विवियन डिसेनाविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती. या गोष्टीला जोडप्याच्या जवळच्या मित्रानेही दुजोरा दिला. ‘प्यार की एक कहानी’ या मालिकेदरम्यान दोघांची भेट झाली होती. त्यानंतर २०१३ मध्ये दोघांनी लग्न केलं. घटस्फोट घेतल्यानंतर वर्षभरात हे जोडपे २०१६ मध्ये वेगळे झाले.

 

Vahbiz Dorabjee
प्यार की एक कहानी’ या मालिकेदरम्यान दोघांची भेट झाली होती. त्यानंतर २०१३ मध्ये दोघांनी लग्न केलं.

 

कौटुंबिक हिंसाचाराचा विचार केला तर खेड्यापाड्यातील आणि शहरातील अशिक्षित महिलांनाच या छळाचा सामना करावा लागतो, असं मानलं जातं. हे पूर्णपणे सत्य नसलं तरी आज समाजाची प्रगती होत असूनही लोकांचा स्त्रियांबद्दलचा विचार अजूनही परंपरावादी आहे. घराच्या चार भिंतींच्या आतही त्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जातो. यामध्ये केवळ अशिक्षित किंवा आर्थिकदृष्ट्या पतीवर अवलंबून असलेल्या महिलांचा समावेश नाही, तर चांगल्या कुटुंबातील आणि लाखोंची कमाई करणाऱ्या अभिनेत्रींचाही समावेश आहे.