Maharashtra Unlock : थिएटर्स १०० टक्के खुली होणार, कोणत्या मराठी चित्रपटांना होणार फायदा ?

दरम्यान चित्रपटगृहे १०० टक्के क्षमतेने सुरू झाल्याने आगामी काळात येऊ घातलेल्या चित्रपटांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. पांडू, झिम्मा त्याचप्रमाणे मागील आठवड्यात प्रदर्शित झालेल्या पॉडेंचेरी, पावनखिंड चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगलीच घोडदौड सुरू ठेवली. झिम्मा आणि पावनखिंड हे चित्रपट आजही चित्रपटगृहांमध्ये कमाल कमाई करत आहेत. थिएटर्स १०० टक्के खुली होणार असल्याने येत्या काळात कोणत्या मराठी चित्रपटांना त्याचा फायदा होणार जाणून घ्या. 

These Marathi movies will benefit after the theaters open 100 percent capacity
Maharashtra Unlock : थिएटर्स १०० टक्के खुली होणार, कोणत्या मराठी चित्रपटांना होणार फायदा ?

Maharashtra Unlock :  अखेर राज्यातील काही भागातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे १०० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे.  कोरोना रुग्णांची संख्या देखील अटोक्यात आलेली असताना चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे १०० टक्के क्षमतेने सुरू करण्यासाठी अनेक स्तरातून मागणी करण्यात आली. अनेक अभिनेते नाट्यकर्मींना या विरोधात आवाज उठवला होता. अनेक राजकीय पक्षांनी देखील सरकारपर्यंत नाट्यकर्मीं बाजू मांडली आणि अखेर आज राज्यातील काही भागातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे १०० टक्के क्षमतेने सुरू करण्यास मान्यता दिली आहे. चित्रपट प्रेमी आणि रंगकर्मींसाठी हा आनंदाचा क्षण आहे.

राज्यात कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर २२ ऑक्टोबर २०२१पासून चित्रपटगृहे ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यात आलीत.  ५० टक्के क्षमतेने चित्रपटगृहे सुरू असताना देखील मराठी चित्रपटांना प्रेक्षकांनी अफलातून प्रतिसाद दिला. मात्र तिच क्षमता जर १०० टक्के असती तर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेले चित्रपट आणखी कमाई करू शकले असते. दरम्यान चित्रपटगृहे १०० टक्के क्षमतेने सुरू झाल्याने आगामी काळात येऊ घातलेल्या चित्रपटांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. पांडू, झिम्मा त्याचप्रमाणे मागील आठवड्यात प्रदर्शित झालेल्या पॉडेंचेरी, पावनखिंड चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगलीच घोडदौड सुरू ठेवली. झिम्मा आणि पावनखिंड हे चित्रपट आजही चित्रपटगृहांमध्ये कमाल कमाई करत आहेत. थिएटर्स १०० टक्के खुली होणार असल्याने येत्या काळात कोणत्या मराठी चित्रपटांना त्याचा फायदा होणार जाणून घ्या.

१४३

४ मार्चला १४३ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटील येतोय. योगेश भोसले दिग्दर्शित या चित्रपटात शितल अहिराव आणि वृषभ शाह हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.

झटका

गौवर उपासनी आणि पूर्णिमा डे अभिनीत झटका हा चित्रपट येत्या ४ मार्चला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

एक नंबर

अभिनेता प्रथमेश परबचा आणखी एक धम्माल चित्रपट एक नंबर हा ११ मार्चला प्रदर्शित होणार आहे. मिलिंद झुंबेर कवडे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

हवाहवाई

एप्रिल महिन्यात बरेच मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. महेश टिळेकर यांचा हवाहवाई हा चित्रपट १ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. अभिनेता अंकित मोहन या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे.

विशू

 

अभिनेता गश्मीर महाजनी प्रमुख भूमिकेत असलेला विशू हा चित्रपट देखील १ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. मयुर शिंदे यांनी चित्रपटात दिग्दर्शन केले आहे.

मी वसंतराव

मी वसंतराव हा बहुप्रतिक्षीत चित्रपट गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर म्हणजेच १ एप्रिल रोजी प्रेक्षकांना पाहता येणार आहे.गुडीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रेक्षकांना वसंतराव देशपांडे यांच्या सुरांची सुरेल मैफल अनुभवता येणार आहे.

शेर शिवराज हैं

पावखिंडच्या अभूतपूर्व यशानंतर दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा शेर शिवराज हैं हा चित्रपट २९ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटातील कलाकारांविषयी अद्याप कोणताही खुलासा करण्यात आलेला नाहीये. शिवराज अष्टकातील शेर शिवराज हैं हे चौथे पुष्प असणार आहे. प्रेक्षक या चित्रपटाची देखील आतुरतेने वाट पाहत आहेत.

चंद्रमुखी

अभिनेता दिग्दर्शक प्रसाद ओकचा चंद्रमुखी हा बहुप्रतिक्षीत चित्रपटही २९ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लाल दिवा आणि घुंगरांच्या गुंतावळीची ही राजकीय रशीली प्रेमकहाणी प्रेक्षकांना ‘चंद्रमुखी’मध्ये पाहायला मिळणार आहे.


हेही वाचा – Maharashtra Unlock: सिनेमा, नाट्यगृहे १०० टक्के क्षमतेने खुली होणार, राज्यातील १४ जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल, नवी नियमावली जाहीर