HomeमनोरंजनSwapnil Joshi : स्वप्नील जोशीचे हे दोन चित्रपट ठरले हायस्ट ग्रोसिंग फिल्म...

Swapnil Joshi : स्वप्नील जोशीचे हे दोन चित्रपट ठरले हायस्ट ग्रोसिंग फिल्म !

Subscribe

2024 वर्षाला निरोप देताना अनेक कलाकारांनी हे वर्ष खास केलं ! बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करणारे मराठी मधले अनेक चित्रपट चर्चेत देखील आले अश्यातच निर्माता आणि अभिनेता म्हणून स्वप्नील जोशीच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई तर केली पण हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हाययेस्ट ग्रोसिग फिल्म ठरले.

निर्माता म्हणून स्वप्नील जोशी ने 2024 वर्षात ” नाच गं घुमा ” चित्रपटाची निर्मिती केली आणि हा चित्रपट या वर्षातला सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला सोबतीने बॉक्स ऑफिसवर हाऊसफुल्ल ठरला. जगभरात या चित्रपटाने प्रेक्षकांचं प्रेम मिळवलं.

- Advertisement -

पुढे स्वप्नीलने बहुचर्चित ” नवरा माझा नवसाचा 2 ” चित्रपटातून अभिनेता म्हणून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन तर केलं पण सोबतीने चित्रपटगृहात सगळ्यात जास्त दिवस हा चित्रपट देखील राहिला. स्वप्नील जोशीची मुख्य भूमिका असलेला नवरा माझा नवसाचा 2 हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरून त्याने आणि बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली.

वर्ष संपताना स्वप्नील जोशी हा या वर्षातला सगळ्यात हाययेस्ट ग्रोसिग फिल्म देणारा निर्माता आणि अभिनेता ठरला आहे. आगमी वर्षात स्वप्नील आता काय घेऊन येणार हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा : New Marathi Movie : स ला ते स ला ना ते” या चित्रपटाचे अनोखे पोस्टर लॉन्च


Edited By : Prachi Manjrekar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -