घरमनोरंजनते कारस्थानाचे शिकार... शत्रुघ्न सिन्हांकडून कमाल आर खानची पाठराखण

ते कारस्थानाचे शिकार… शत्रुघ्न सिन्हांकडून कमाल आर खानची पाठराखण

Subscribe

कमाल आर खानला मुंबई पोलिसांनी अक्षय कुमारच्या 'लक्ष्मी' चित्रपटावर अपशब्द टिपण्णी केल्याच्या वादग्रस्त विधानावरून अटक करण्यात आलं होतं.

अभिनेता आणि चित्रपट समीक्षक कमाल आर खानच्या सध्या त्याच्या एका वादग्रस्त ट्वीटमुळे अडचणीत सापडल्यानंतर आता कमाल खानवर छेडछाडीचा आरोप लावण्यात आला आहे. दरम्यान, आता या सर्व प्रकरणावर बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हाने केआरकेची पाठराखण केली आहे. एकानंतर एक ट्वीट करत शत्रुघ्न सिन्हा यांनी केआरकेची बाजू घेतली आहे आणि सोबतच केआरकेला कारस्थानाचे बळी होत असल्याचं म्हटलं आहे.

शत्रुघ्न सिन्हाने घेतली केआरकेची बाजू
शत्रुघ्न सिन्हा यांनी आपल्या ट्वीट अकाऊंटवर लिहिलंय की, कोणीही कमाल आर खानला विसरू नका आणि सगळ्यांनी लक्षात ठेवायला हवं की, मोठ्या विरोधानंतर आणि संघर्षानंतर केआरके एक स्वनिर्मित व्यक्ति आहे. त्यांच्यावर अद्भूत शक्तिमानाचा आर्शीवाद आहे. त्यांनी चित्रपट सृष्टीसोबतच समाजामध्ये देखील आपली जागा बनवली आहे.

- Advertisement -

तसेच त्यांनी पुढे लिहिलं की, “त्यांची सर्वात मोठी संपत्ती त्यांचा आत्मविश्वास आहे. ते न घाबरता बोलतात. ते सर्व अडचणींविरोधात आपलं मत मांडताना घाबरत नाहीत कारण, त्यांना कायदा आणि संविधानाच्या ढाच्यामध्ये कोणात्याही प्रकारची धारण बनवण्याचे स्वातंत्र्य आहे. असं वाटत की, ते या परिस्थितीच्या कारस्थानाचे शिकार झाले आहेत. आशा, कामना आणि प्रार्थना आहे की कमाल राशिद खानला लवकरात लवकर न्याय मिळावा. जय हिंद”

कमाल आर खानला मुंबई पोलिसांनी अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी’ चित्रपटावर अपशब्द टिपण्णी केल्याच्या वादग्रस्त विधानावरून अटक करण्यात आलं होतं. ज्यानंतर कोर्टाने त्याला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं होतं. परंतु आता मिळालेल्या माहितीनुसार, 2019 मध्ये चित्रपटामध्ये मुख्य भूमिका देण्या ऐवजी लैंगिक शोषणाची मागणी केली होती. त्याच आरोपामध्ये केआरकेला अटक करण्यात आली होती.


हेही वाचा : ‘आशिकी 3’ मध्ये कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -