‘या’ 6 सुपरहिट चित्रपटांनी रेखाला बनवलं सुपरस्टार

बॉलिवूडची सदाबहार अभिनेत्री रेखा चित्रपटसृष्टीतील एक अशी अभिनेत्री आहे. जिला तिच्या सौंदर्यामुळे ओळखले जाते. रेखाचे पुर्ण नाव भानुरेखा गणेशम आहे. आज रेखाचा 68 वा वाढदिवस आहे. रेखाचा जन्म 10 ऑक्टोबर 1954 साली मद्रासमध्ये झाला होता. तिचे वडील जेमिनी गणेशन तमिळ चित्रपटांतील प्रसिद्घ अभिनेते होते. तसेच रेखाची आई पुष्पावल्ली देखील अभिनेत्री होती. त्यामुळे लहानपणापासूनच रेखाला अभिनयाचे धडे मिळाले होते. रेखाने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र, यांपैकी काही चित्रपटांनी रेखाचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं.

‘या’ 6 चित्रपटांनी रेखाला बनवलं सुपरस्टार

  • सावन भादों


रेखा ने या चित्रपटासोबतच बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. याआधी तिने तमिळ चित्रपटांमध्ये काम केले होते. मात्र, ज्यावेळी रेखाने हा चित्रपट करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा तिला हिंदी बोलता आणि वाचता येत नव्हते. परंतु शूटिंगदरम्यान ती हळूहळू हिंदी भाषा शिकू लागली.

  • दो अनजाने


अमिताभ आणि रेखा ने ‘दो अनजाने’ या चित्रपटामध्ये सुद्धा एकत्र काम केले होते. या चित्रपटामध्ये रेखा ने एका लोभी पत्नीची भूमिका साकारली होती. या चित्रपटात रेखाने उत्तम काम केले होते.

  • उमराव जान


रेखाला तिच्या ‘उमराव जान’ या चित्रपटाने मोठी प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटात रेखाने नृत्यांगना आणि वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रीची भूमिका साकारली होती.

  • मुकद्दर का सिकंदर


या चित्रपटात रेखाच्या भूमिकेचे नाव जोहराबाई होतं. या चित्रपटात अमिताभ बच्चन देखील होते. त्या काळी हा चित्रपट सुपरहिट झाला होता.

  • खूबसुरत


या चित्रपटामध्ये रेखाने मंजू दयालची भूमिका साकारली होती. हा चित्रपट तिच्या करिअरमधील चांगल्या चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटासाठी रेखाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देखील मिळाला होता.

  • सिलसिला


या चित्रपटामध्ये रेखासोबत अमिताभ बच्चन आणि जया बच्चन देखील होत्या. या चित्रपटादरम्यान अमिताभ आणि रेखा एकमेकांच्या खूप जवळ आले होते. त्या काळी दोघांच्या अफेअरची चर्चा सुरु होती. मात्र, त्यानंतर दोघांनी परत एकमेकांसोबत काम केले नाही.


हेहा वाचा :

लग्नाच्या 4 महिन्यानंतर नयनताराने दिला जुळ्या मुलांना जन्म; विघ्नेशने पोस्ट शेअर करत दिली माहिती