आज देशभरात कृष्णाष्टमी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. भारतातील मंदिरांमध्ये देखील मोठा उत्सव पार पडत आहे. अनेक भाविक श्री कृष्णाच्या दर्शनासाठी मंदिरांमध्ये गर्दी करत आहेत. श्री कृष्णांच्या लिलांचे अनेक किस्से आपण अनेक आध्यात्मिक मालिका आणि चित्रपटांमधून पाहतो. असे अनेक कलाकार आहेत जे मालिका आणि चित्रपटांमधून श्री कृष्णाची भूमिका साकारुन लोकप्रिय झाले आहेत.
‘हे’ अभिनेते श्री कृष्णाच्या भूमिकेत झाले लोकप्रिय
- नितीश भारद्वाज
90 च्या दशकात प्रचंड लोकप्रिय असलेल्या महाभारत मालिकेत नितीश भारद्वाज यांनी साकारलेली श्रीकृष्णाची भूमिका अजरामर झाली. या शिवाय आजवर त्यांनी अनेक चित्रपट, मालिका, नाटकांमधून कृष्णाची भूमिका साकारली आहे.
- सर्वदमन बॅनर्जी
90 च्या दशकातील रामानंद सागर यांच्या श्रीकृष्ण मालिकेत सर्वदमन बॅनर्जी यांनी श्रीकृष्णाची भूमिका साकारली होती. ही भूमिका देखील लोकप्रिय झाली होती.
- स्वप्निल जोशी
मराठमोळा अभिनेता स्वप्नील जोशीने देखील 1993 मधील रामानंद सागर यांच्या श्रीकृष्ण मालिकेत श्रीकृष्णाची भूमिका साकारली होती.
- सौरभ जैन
अभिनेता सौरभ जैन यांने देखील 2013 मधील महाभारत या मालिकेत कृष्णाची भूमिका साकारली होती. ही भूमिका खूप लोकप्रिय ठरली. या मालिके व्यतिरिक्त सौरभने अनेक मालिकांमध्ये श्री विष्णूंची भूमिका देखील साकारली आहे.
- सुमेध मुदगलकर
2018 मधील राधा कृष्ण मालिकेत सुमेध मुदगलकरने देखील श्रीकृष्णाची भूमिका साकारली होती. या मालिकेतील सुमेधच्या भूमिके आणि अभिनयाने अनेकांना वेड लावले होते.