Thursday, June 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन 'या'अभिनेत्याकडून विक्की-कतरीनाचे नाते उघड, फॅन्ससाठी गुड न्यूज

‘या’अभिनेत्याकडून विक्की-कतरीनाचे नाते उघड, फॅन्ससाठी गुड न्यूज

विकी कौशल सध्या लाखो तरूणींच्या गळ्यातला ताईत बनला आहे. ‘उरी:द सर्जिकल स्ट्राईक्स’ नंतर तर विकी कौशलच्या प्रेमात सगळेच वेडे झाले आहे

Related Story

- Advertisement -

बॉलीवुड अभिनेता विक्की कौशल (Vicky Kaushal) आणि कतरीना कैफ (Katrina Kaif) यांच्या रिलेशनशिपची चर्चा सध्या जोरदार रंगत आहे. विक्कीला अनेकादा कतरीनाच्या घराबाहेर स्पॉट करण्यात आले आहे. दिवाळी मधील एका पार्टीतील दोघांचाही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर दोघेही रिलेशनशीपमध्ये आहे अश्या चर्चांना उधाण आले. दोघांनी अद्याप आपल्या रिलेशनबद्दल अधिकृतरित्या माहिती दिली नसली तरी एका अभिनेत्याने त्यांची पोल खोल केली आहे. स्पॉटबॉयच्या महितीनुसार 2019 पासून विक्की आणि कतरीना एकमेकांना डेट करत आहेत. आणि आता सोनम कपूरच्या भावाने म्हणजेच हर्षवर्धन कपूरने खुलासा केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

- Advertisement -

विक्की आणि कतरीना खरोखरच डेट करत आहे. झुमच्या ‘बाय इनवाइट ओनली सीज़न 2’ हर्षवर्धन कपूरला अफवांबद्दल विचारण्यात आले की विक्की आणि कतरीना एकमेकांना डेट करत आहेत? त्याने उत्तर दिले की,”होय हे खरं आहे.” हर्षच्या उत्तराने विक्की आणि कतरीनाचे चाहते खूप उस्ताहित झाले आहेत. सध्या दोघांनीही रिलेशन बाबत उघडपणे चर्चा केली नसली तरी अनेकदा ते सोबत दिसतात. अभिनेता विकी कौशल सध्या लाखो तरूणींच्या गळ्यातला ताईत बनला आहे. ‘उरी:द सर्जिकल स्ट्राईक्स’ नंतर तर विकी कौशलच्या प्रेमात सगळेच वेडे झाले आहे. या चित्रपटानंतर त्याच्या चाहत्यांमध्ये वाढ झाली आहे. यात बॉलिवूड अभिनेत्रीही मागे नाहीयेत. अनेक अभिनेत्री सध्या विकीच्या प्रेमात पडल्या आहेत. यामध्ये कतरीनाची भर पडली आहे.


हे हि वाचा – HBD:वयाच्या 15 व्या वर्षी सोनम कापुरने केली होती वेट्रेसची नोकरी

- Advertisement -