घरमनोरंजनबॉलिवूडची 'ही' अभिनेत्री होणार कतरिनाची वहिनी; 'कॉफी विथ करण'मध्ये झाला खुलासा

बॉलिवूडची ‘ही’ अभिनेत्री होणार कतरिनाची वहिनी; ‘कॉफी विथ करण’मध्ये झाला खुलासा

Subscribe

कॉफी विथ करण मध्ये करण म्हणाला की, मालदीव ट्रीपचे काही फोटो समोर आले होते आणि मी कतरिना आणि इलियानाला पहिल्यांदा एकत्र पाहिलं आहे आणि मी नंतर समजून गेलो की सगळं खूप लवकर पुढे जात आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफने नुकत्याच काही महिन्यांपूर्वी तिच्या वाढदिवसाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. ज्या फोटोंमध्ये बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डीक्रूज देखील सहभागी होती. त्यावेळी अनेकांनी असा अंदाज लावला असेल की, कतरिना आणि इलियाना एकमेकींच्या मैत्रिणी आहेत. मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार, इलियाना, कतरिनाचा भाऊ सेबेस्टियनला डेट करत आहे. दरम्यान, अजूनही याबाबचत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. परंतु करण जौहरने ही गोष्ट कंफर्म केली आहे. खरंतर, करण जौहरने त्याच्या कॉफी विथ करणमध्ये या बातमीचा खुलासा केला आहे.

कॉफी विथ करण मध्ये करण म्हणाला की, मालदीव ट्रीपचे काही फोटो समोर आले होते आणि मी कतरिना आणि इलियानाला पहिल्यांदा एकत्र पाहिलं आहे आणि मी नंतर समजून गेलो की सगळं खूप लवकर पुढे जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

- Advertisement -

करणचं बोलनं ऐकूण कतरिना हसू लागते आणि म्हणते की करण जवळच्या गोष्टी लगेच नोटीस करतो. परंतु यावेळी इलियाना आणि तिच्या भावाच्या नात्याबाबत काहीच खुलासा केला नाही.

विक्कीसोबतच्या नात्यावर कतरिना म्हणाली
‘कॉफी विथ करण’ मध्ये कतरिना तिच्या आणि विक्कीच्या नात्याबाबत मोकळेपणाने म्हणाली की, तिने कधी विक्कीला डेट करायचा विचार नव्हता केला. त्यानंतर हळूहळू तिच्या मनात विक्कीबद्दल भावना निर्माण झाल्या आणि याबद्दल तिने जोया अख्तरला तिने सांगितलं. दरम्यान, गेल्या वर्षी राजस्थानमध्ये विक्की आणि कतरिनाचं लग्न पार पडलं होतं.

- Advertisement -

हेही वाचा :

कृष्णा अभिषेक आणि भारती सिंहनंतर चंदन प्रभाकरची देखील ‘द कपिल शर्मा’शो मधून एक्झिट

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -