Friday, April 16, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन 'तुफान'मध्ये फरहान अख्तरसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री

‘तुफान’मध्ये फरहान अख्तरसोबत झळकणार ‘ही’ अभिनेत्री

तसेच तूफान चा प्रिमियर २१ मे, २०२१ रोजी अमेझॉन प्राइम व्हिडिओवर करण्यात येणार आहे

Related Story

- Advertisement -

राकेश मेहरा दिग्दर्शित तुफान या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला होता. बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. फरहानसोबत आता मृणाल ठाकूरदेखील या चित्रपट दिसणार असल्याचे समोर आले आहे. एक साधारण मुलगी अनन्याच्य भूमिकेतत मृणाल दिसणार आहे. भूमिकेसोबत जोडून घेण्यासोबत, या स्पोर्ट्स ड्रामाने मृणाल ठाकुरला आपली मातृभाषा मराठीमध्ये बोलण्याची संधी दिली आहे. या चित्रपटातील भूमिकेविषयी सांगताना मृणाल म्हणाली की, ”सर्वात चांगली गोष्ट ही हे की अनन्या आणि मी दोघीही महाराष्ट्रियन आहोत. तुम्ही मला या चित्रपटात मराठी बोलतान बघाल आणि ते नैसर्गिकरित्या ओघात आहे. जेव्हा तुमच्यासोबत परेश सरांसारखे कलाकार असतात जे मराठीत प्रतिक्रिया देतात , तेव्ह ती एक छान संवादाची आणि मजेची जागा बनून जाते. ”

 

View this post on Instagram

 

A post shared by Mrunal Thakur (@mrunalofficial2016)

 अनन्या ची व्यक्तीरेखा केवळ अज्जू (फरहान अख्तर) च्या जीवनात, परंतु त्याच्या आजूबाजूच्या लोकांनच्या जीवनात देखील प्रेरक आहे. मृणालदेखील अनन्यासारखीच भावुक, उत्साही आणि फैमिली ओरिएंटेड अशा व्यक्तीरेखेन प्रेरित झाल्याचे मृणाल ने सांगितले आहे. फरहान , मृणाल ठाकुर, परेश रावल आणि सुप्रिया पाठक सारख्या कलाकारांसोबत, या स्पोर्ट्स ड्रामामध्ये प्रतिभाशाली कलाकारांची टीम दिसणार आहे. तसेच तूफान चा प्रिमियर २१ मे, २०२१ रोजी अमेझॉन प्राइम व्हिडिओवर करण्यात येणार आहे


- Advertisement -

हे वाचाा-‘मिसेस श्रीलंका’ स्पर्धेच्या मंचावर जोरदार राडा, ‘मिस वर्ल्ड’ने हिसकावलं विजेतीचे मुकुट

- Advertisement -