Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन ऐकावं ते नवलच! 'या' अब्जाधीशाच्या पत्नीने सरोगसीतून दिला 22 बाळांना जन्म

ऐकावं ते नवलच! ‘या’ अब्जाधीशाच्या पत्नीने सरोगसीतून दिला 22 बाळांना जन्म

Subscribe

बॉलिवूड आणि हॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा मागच्या वर्षी आई झाली. प्रियांका आणि निक जोनस सरोगसीद्वारे आई-बाबा झाले. परंतु त्यांच्या आधी असे अनेक प्रसिद्ध व्यक्ती आहेत जे सरोगसीद्वारे पालक झाले आहेत. अशीच एक अरबपतीची पत्नी आहे जिने सरोगसीद्वारे 22 मुलांना जन्म दिला आहे. तिला सरोगसीद्वारे 105 मुलांना जन्म द्यायचा आहे. असा उल्लेख तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर याबाबत उल्लेख केलेला आहे.

या महिलेचं नाव क्रिस्टिना ओजतुर्क असून ती 25 वर्षांची आहे. ती रुसची राजधानी मास्कोमध्ये राहते. या महिलेने एका वर्षात सरोगसीद्वारे 22 मुलांना जन्म दिला आहे. शिवाय या मुलांच्या संगोपनासाठी तिने 16 महिलांची नियुक्ती केली आहे. ज्यांचा 1 वर्षाचा खर्च 68 लाख इतका आहे. क्रिस्टिनाला पती गलिप ओजतुर्क 57 वर्षाचा असून तो एक हॉटेल व्यवसायी आहे. या दोघांची भेट जॉर्जियामध्ये झाली होती. या दोघांचे पहिले मुल 10 मार्च 2020 मध्ये जन्माला आले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kristina Ozturk (@batumi_mama)

- Advertisement -

क्रिस्टिना ओजतुर्क आणि तिच्या पतीने आत्तापर्यंत सरोगसीसाठी 1 कोटी 43 लाख खर्च केला आहे. तसेच मुलांच्या जन्मानंतर त्यांना पाहण्यासाठी 16 महिलांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा 1 वर्षाचा खर्च 68 लाख आहे.

भारतामधील अनेक कलाकार देखील झाले आहेत सरोगसीद्वारे आई-वडील
प्रियंका चोप्रा व्यतिरिक्त शाहरुख खान, आमिर खान, प्रीति जिंटा, शिल्पा शेट्टी, करण जौहर, एकता कपूर आणि तुषार कपूर, नयनतारा-विघ्नेश देखील सरोगसीद्वारे आई-बाबा झाले आहेत.

- Advertisement -

 


हेही वाचा :

अमृता फडणवीस यांचं ‘अज मैं मूड बणा लेया’ गाणं प्रदर्शित; अल्पावधीत गाण्याला लाखो व्ह्यूज

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -