घरमनोरंजनमुंबईतील हॅटमॅन किलरसोबत 'या' बॉलिवूड अभिनेत्याचे कनेक्शन

मुंबईतील हॅटमॅन किलरसोबत ‘या’ बॉलिवूड अभिनेत्याचे कनेक्शन

Subscribe

सध्या सोशल मीडियावर हॅटमॅन किलरचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओनुसार मुंबईमध्ये एक हॅटमॅन किलर फिरत आहे. जो महिलांची हत्या करत आहे. ट्वीटरवर देखील #HatmanKillerInMumbai अश्या हॅशटॅगसोबत हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे आता सर्वत्र खळबळ उडू लागली आहे. दरम्यान, आता हा नक्की काय प्रकार आहे? हा व्हिडीओ खरा आहे का? असे अनेक प्रश्न सोशल मीडियावर विचारले जात आहेत.

हा व्हायरल व्हिडीओ 1:34 सेकंदाचा असून एका सीसीटीव्हीच्या माध्यमातून ही घटना कॅमेऱ्यात कैद करण्यात आली आहे. जेव्हा या व्हिडीओबाबत मुंबई पोलिसांना सत्यता विचारण्यात आली तेव्हा मुंबई पोलिसांनी असा कोणताही हॅटमॅन मुंबईमध्ये फिरत नसल्याचे सांगितले.

- Advertisement -

व्हायरल व्हिडीओशी अभिनेता तुषार कपूरशी कनेक्शन
सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओचे बॉलिवूड अभिनेता तुषार कपूरसोबत काहीतरी कनेक्शन असल्याचं म्हटलं जात आहे. खरंतर, तुषार कपूरचा आगामी चित्रपट ‘मारिच’चे प्रमोशन करण्यासाठी हा व्हिडीओ व्हायरल केला जात आहे. एका ट्वीटर अकाऊंटवरुन याबाबत खुलासा करण्यात आला आहे. मात्र, अद्याप तुषार कूपरने याबाबत काहीही खुलासा केलेला नाही.

दरम्यान, तुषार कपूर आणि नसीरुद्दीन शाह यांचा ‘मारिच’ चित्रपट 9 डिसेंबरपासून चित्रपटगृहांमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाच तुषार कपूर पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा :

बिपाशाला रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज, चिमुकलीचे घरी जोरदार स्वागत

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -