‘पुष्पा पार्ट २’ मध्ये ‘या’ बॉलिवूड अभिनेत्याची एंट्री…

अजूनही पुष्पा चित्रपटाच्या पहिल्या भागाची जाऊन ओरसली नसताना 'पुष्पा पार्ट २' या चित्रपटाची मोठ्या प्रमाणावर चर्चा होते आहे. या चित्रपटामध्ये हिंदी चित्रपट सृष्टीमधील एक नामांकित अभिनेता झळकणार आहे अशी माहिती सुद्धा समोर येत आहे.

दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन(allu arjun) आणि अभिनेत्री रश्मीका मंदाना(rashmika mandana) यांचा पुष्पा हा चित्रपट सुपर हिट ठरला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही कमाल दाखवली होती. या चित्रपटातील गाणी आणि आणि संवाद यांना सुद्धा प्रेक्षकांची मोठया प्रमाणावर पसंती मिळाली. दरम्यान अजूनही पुष्पा चित्रपटाच्या पहिल्या भागाची जाऊन ओरसली नसताना ‘पुष्पा पार्ट २'(pushpa part 2) या चित्रपटाची मोठ्या प्रमाणावर चर्चा होते आहे. या चित्रपटामध्ये हिंदी चित्रपट सृष्टीमधील एक नामांकित अभिनेता झळकणार आहे अशी माहिती सुद्धा समोर येत आहे. ‘पुष्पा पार्ट २’ मध्ये बॉलिवूड मधील प्रसिद्ध अभिनेता मनोज वाजपेयी दिसणार असल्याचं बोललं जात आहे.

हे ही वाचा – प्रश्न हा कम्फर्ट झोनचा आहे, हिंदी चित्रपटात काम करण्यावरून अल्लू अर्जुनचं मत…

लाल चंदनाची होणारी तस्करीवर या चित्रपटाची कथा फेर धरते. दरम्यान या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात चंदनाची तस्करी करणाऱ्या पुष्पराजची कथा उत्तर प्रदेशात जोडण्यात येणार आहे. आणि अशातच या चित्रपटात अभिनेता मनोज वाजपेयी(manoj vajpeyee) याची एंट्री होणार आहे. कोणत्याही चित्रपटात व्हिलनची एंट्री झाली की त्या चित्रपटाची कथा अधिकच रंजक होते.

हे ही वाचा – हृतिक रोशनचं पुन्हा एकदा ‘शुभ मंगल’? १२ वर्षांनी लहान आहे होणारी पत्नी

पुष्पा पार्ट १ मधली कथा सुद्धा प्रेक्षकांना जास्त प्रमाणात भावली होती. हा चित्रपट सुपर हिट झाल्या नंतर या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. दरम्यान ‘पुष्पा पार्ट २'(pushpa part 2) ची कथा सुद्धा अधीक रंजक होण्यासाठी या चित्रपटात व्हिलनची एंट्री सुद्धा होणार आहे अश्या चर्चा सुद्धा रंगत आहेत. या चित्रपटात व्हिलनची भूमिका साकारण्यासाठी तामिळ चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय नेते विजय सेतुपाती यांच्या नावावर निर्माते शिक्कामोर्तब करण्याची शक्यता आहे असंही बोललं जात आहे. दरम्यान या चितपटात नेमकी कोणती वेगळी कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आणि यातली गाणी कशी असणार या विषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे;.

हे ही वाचा – मराठमोळ्या प्रियांका मोरेच्या ‘घासजोमी’ या बंगाली माहितीपटाची जर्मनवारी