घरमनोरंजनबॉलीवूडमध्ये अभिनेत्रींना अभिनेत्यापेक्षा कमी मानधन; 'या' अभिनेत्रीची तक्रार

बॉलीवूडमध्ये अभिनेत्रींना अभिनेत्यापेक्षा कमी मानधन; ‘या’ अभिनेत्रीची तक्रार

Subscribe

बॉलीवूडमध्ये पुरुष आणि महिला कलाकारांना एकसमान मानधन मिळण्याच्या दिशेने अजून बरेच प्रयत्न होणे गरजेचे आहे.

बॉलीवूडमधील करीअर हे तरुण-तरुणींचे स्वप्न असते. त्यासाठी कठोर परिश्रम करण्याची त्यांची तयारी असते. पण बॉलीवूडमध्ये अभिनेता आणि अभिनेत्रींना देण्यात येणाऱ्या मानधनात खूप तफावत असल्याची तक्रार बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नू हिने केली आहे. बॉलीवूडमध्ये पुरुष आणि महिला कलाकारांना एकसमान मानधन मिळण्याच्या दिशेने अजून बरेच प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे मत तापसीने व्यक्त केले आहे. गोवा मध्ये सुरु असलेल्या फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडीया या सोहळ्यातील इंटरॅक्टीव्ह सेशन दरम्यान तापसीने उपस्थितांशी संवाद साधला.

- Advertisement -

काय म्हणाली तापसी पन्नू?

अभिनेत्री तापसी पन्नू म्हणाली की, “बॉलीवूडमध्ये अभिनेत्यांना देण्यात येणाऱ्या मानधनाच्या तुलनेत त्यांच्या मानधनाच्या अर्धे मानधनसुद्धा अभिनेत्रींना देण्यात येत नाही.” तापसी पुढे म्हणाली की, “अनेक वेळा महिला कलाकारांना देण्यात येणारे मानधन हे पाव भागसुद्धा नसते. अनेकदा देण्यात येणारे मानधन त्यापेक्षाही कमी असते. अ गटातील प्रमुख अभिनेत्यांना देण्यात येणाऱ्या मानधनाच्या अर्ध्या किंमतीत महिला प्रधान चित्रपटांचे संपूर्ण बजेट असते” असेही ती यावेळी म्हणाली. ती पुढे म्हणाली की, “माझ्या हयातीत तरी या परिस्थितीत नक्कीच बदल होईल. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा प्रेक्षक महिला प्रधान चित्रपटांना चित्रपटगृहात जाऊन पाहतील. केवळ बॉक्स ऑफीसच यामध्ये बदल घडवू शकतो.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -