घरमनोरंजनकान्सच्या रेड कार्पेटवर दिसणार 'हे' बॉलिवूड स्टार्स

कान्सच्या रेड कार्पेटवर दिसणार ‘हे’ बॉलिवूड स्टार्स

Subscribe

७५ व्या कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये रेड कार्पेट इवेंटसाठी भारतीय दर्शकांचे भव्य आयोजन केले जाणार आहे. यामध्ये भारतातील ए.आर. रहमान, शेखर कपूर, अक्षय कुमार, रिकी केज असे अनेक दिग्गज कलाकार कान्समध्ये सहभागी होणार आहेत. १७ मे २०२२ रोजी कान्स फिल्म फेस्टिवल २०२२च्या उद्घाटनाच्या दिवशी भारतीय सिनेसृष्टीतील कलाकार भारतीय प्रतिनिधिमंडळाच्या रूपात रेड कार्पेटवर चालतील. केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर कान्समध्ये भारतीय प्रतिनिधिमंडळाचे नेतृत्व करतील.

या दिग्गज कलाकारांच्या यादीमध्ये अनेक प्रसिद्ध कलाकार आणि संगीत क्षेत्रीतील मंडळी सहभागी असतील. सहभागी होणाऱ्या कलाकरांची यादी

- Advertisement -

1. अक्षय कुमार ( बॉलीवुड अभिनेता )
2. ए. आर. रहमान (इंटरनॅशनल संगीतकार)
3. मामे खान (लोक संगीतकार, गायक)
4. नवाजुद्दीन सिद्दीकी (बॉलीवुड अभिनेता )
5. नयनतारा (अभिनेता, मल्याळम, तमिळ)
6. पूजा हेगड़े ( हिंदी, तेलुगू अभिनेत्री)
7. प्रसून जोशी (अध्यक्ष, सीबीएफसी)
8. आर. माधवन (अभिनेता, प्रोड्यूसर)
9. रिकी केज (संगीतकार)
10. शेखर कपूर (चित्रपट दिग्दर्शक)
11. तमन्ना भाटिया (अभिनेत्री, हिंदी, तेलुगू, तमिळ चित्रपट)
12. वाणी त्रिपाठी (अभिनेत्री)

या वर्षी संस्कृती, परंपरा आणि विकासाशी संबंधित भारताच्या समृद्धी आणि विविधतेला चित्रपटाच्या माध्यमातून प्रदर्शित करण्याचा विचार करण्यात येणार आहे. देशातील विविध भागातील सामर्थ्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी प्रत्येक भागतील या प्रतिनिधिमंडळाच्या सदस्यांना निवडण्यात आले आहे.

- Advertisement -

कान्समध्ये पहिल्यांदाच कुठल्यातरी देशाला इतका सन्मान देण्यात येणार आहे, भारत देश आपल्या आजादीचा अमृत मोहोत्सव साजरा करत आहे. अशाचवेळी भारत आणि फ्रांस सुद्धा या वर्षी आपल्या राजनीति संबंधाचे ७५ वर्ष पूर्ण झाल्याचा उत्सव साजरा करत आहेत. यापूर्वी केंद्रीय मंत्र्यांनी भारत कान्समध्ये “कंट्री ऑफ ऑनर” म्हणून सहभागी होणार असल्याची घोषणा दिली होती.

 


हेही वाचा :सिंगापूरमध्ये ‘द कश्मीर फाइल्स’ला विरोध

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -